शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शनिवार शेवटचा दिवस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:41 IST

वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

ठळक मुद्देएकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत  आहे. शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.

 वाशिम : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना १४ एप्रिलपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस असून, पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी केले.दिड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या हिस्स्याची संपूर्ण रक्कम भरण्याचा कालावधी ३० जून २०१८ पर्यंत  आहे.राज्य शासनाने १३ मार्च २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कर्जमाफीस व एकवेळ समझोता योजनेस (वन टाईम सेटलमेंट) पात्र शेतकऱ्यांच्या थकीत रक्कमेवर १ ऑगस्ट २०१७ ते कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंतच्या कालावधीत व्याज आकारू नये, अशा सूचना सर्व बँकांना व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांना दिल्या आहेत. याऊपरही काही बँका व्याज आकारत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.कर्जमाफी योजनेस पात्र असलेल्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपले ऑनलाईन अर्ज सादर केलेले नाहीत, त्यांना १४ एप्रिल २०१८ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच शासनाच्या ७ डिसेंबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार एकवेळ समझोता योजनेंतर्गत दीड लाख रुपयांवरील रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०१८ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कटके यांनी केले आहे.दरम्यान, ग्रामीण भागातील काही आपले सरकार सेवा केंद्रात नेट कनेक्टिव्हीटी नसल्याने शेतकऱ्यांना शहरी भागात अर्ज भरण्यासाठी यावे लागत आहे. कर्जमाफीच्या अर्जासाठी आता शेवटचा एक दिवस शिल्लक असल्याने शेतकरयांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन कटके यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती