शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले सरकार सेवा केंद्र’साठी अर्ज सादर करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 13:11 IST

पले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील ११७ रिक्त ठिकाणांकरीता ३० मे पासून अर्ज मागविले आहेत. १० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा पोहचविण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर योजना राबविली जात आहे. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील ११७ रिक्त ठिकाणांकरीता ३० मे पासून अर्ज मागविले आहेत. १० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.वाशिम तालुक्यातील १०, मालेगाव व  मंगरूळपीर तालुक्यातील प्रत्येकी १५, रिसोड तालुक्यातील १८, कारंजा तालुका ३८ आणि मानोरा तालुक्यात २१ अशा एकूण ११७ ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र रिक्त आहेत. या रिक्त ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्राची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी ३० मे २०१९ पासून जिल्हा प्रशासनाने अर्ज मागविले आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १० जून आहे.  विहित मुदतीत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ११ ते १४ जून २०१९ या कालावधीत होणार असून, १८ जून २०१९ रोजी पात्र-अपात्र अर्जांची यादी प्रसिद्ध होईल. अर्जांचा नमुना, आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करावयाच्या गावांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपले सरकार सेवा केंद्राकरीता अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागात सादर कराव्या लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतच्या १९ जानेवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राची नियुक्ती केली जाणार आहे. आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करणारा नागरिक हा त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्र हे केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अधिसुचित ठिकाणीच चालवणे क्रमप्राप्त आहे. केंद्राचे ठिकाण बदलण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास, गंभीर स्वरुपाची चूक समजून, केंद्र रद्द करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. अगोदरपासून आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरता येणार नाही, ही अट टाकण्यात आली आहे. इच्छूक नागरिकांनी १० जून पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिम