शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:28 IST

वाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय  महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्हय़ातील ९७  किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार  आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ ऑगस्ट रोजी जारी  झाले असून, संबंधित शेतकर्‍यांना २१ ऑगस्टपर्यंत उ पविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम  यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत. 

ठळक मुद्देअकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग भारत सरकारचे राजपत्र १ ऑगस्ट रोजी जारी२१ ऑगस्टपर्यंत स्वीकारले जातील आक्षेप!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अकोला-हैद्राबाद या १६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय  महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वाशिम जिल्हय़ातील ९७  किलोमीटर रस्त्यालगतच्या जमिनीचे संपादन केले जाणार  आहे. याबाबत भारत सरकारचे राजपत्र १ ऑगस्ट रोजी जारी  झाले असून, संबंधित शेतकर्‍यांना २१ ऑगस्टपर्यंत उ पविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वाशिम  यांच्या कार्यालयाकडे आक्षेप नोंदविता येणार आहेत. अकोला ते हैदराबाद या महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा  दर्जा मिळाल्यानंतर रस्ता रूंदीकरण, चौपदरीकरणाच्या  कामाला सुरुवात केली जाणार आहे. तत्पूर्वी रस्त्यालगतची  जमीन संपादन करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.  अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मेडशी गावा पासून ते हिंगोली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या राजगाव  या दरम्यानच्या गावातील शेतकर्‍यांची रस्त्यालगतची जमीन  संपादीत केली जाणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या रस्ते  वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाने राजपत्र जारी केले असून,  कोणत्या गावातील किती शेतकर्‍यांची जमीन संपादीत केली  जाणार आहे, याबाबतचा लेखाजोखा जाहीर केला आहे.  सदर जमिनीच्या संदर्भात जमीन मालक किंवा जमिनीशी हि तसंबंध असणार्‍या व्यक्तिला काही शंका किंवा आक्षेप  असेल तर २१ ऑगस्टपर्यंत वाशिम येथील उपविभागीय  अधिकारी कार्यालयात लेखी स्वरुपात हरकत किंवा आक्षेप  नोंदविता येणार आहेत. प्रत्येक शेतकर्‍यास आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात  येणार आहे. तथापि, सर्व हरकती ऐकून घेतल्यानंतर आणि  काही प्रकरणात चौकशी आवश्यक असल्यास सक्षम  प्राधिकरणामार्फत चौकशी केली जाईल. चौकशीअंती हरक ती स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा आदेश जारी  करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकरणास देण्यात आले आहे त. सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला आदेश हा अंतिम  राहणार आहे. हरकती व आक्षेपांचे निरासरण केल्यानंतर  शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या महामार्गालगतच्या  जमिनीचे संपादन केले जाणार आहे. भूसंपादनानंतर पुढील  कार्यवाही केली जाणार आहे. 

या गावांतील जमिनीचे होणार संपादन अकोला जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तथा वाशिम  जिल्हा हद्दीतील मेडशी, रिधोरा, सुकांडा, इरळा, डही,  नागरतास, मालेगाव, कोल्ही, अमानी, झोडगा खुर्द, झोडगा  बु., चिवरा, सावरगाव बरडे, जांभरूण परांडे, सोनखास,  जांभरूण नावजी, गोंदेश्‍वर, जांभरूण भित्ते, अंजनखेड,  धुमका, राजगाव आदी गावांतील रस्त्यालगतच्या जमिनीचे  संपादन केले जाणार आहे. 

अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी  भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. यासंदर्भात संबंधित  शेतकर्‍यांना काही आक्षेप किंवा हरकती नोंदविता येणार  आहेत. कुणाला काही आक्षेप असल्यास उपविभागीय  अधिकारी कार्यालय वाशिम येथे लेखी स्वरुपात हरकती  नोंदवाव्यात.- अभिषेक देशमुख,उपविभागीय अधिकारी, वाशिम.