शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

लाखो भाविक झाले नतमस्तक!

By admin | Updated: April 16, 2016 01:48 IST

वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे रामनवमी उत्सव; देशभरातील भाविकांची उपस्थिती.

मानोरा (जि. वाशिम): बंजारा समाजाची काशी म्हणून ख्याती असलेल्या पोहरादेवी येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांच्या उपस्थितीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. कर्नाटक, तामिळनाडू, गुजरातसह संपूर्ण देशातून आलेले भाविक शुक्रवारी पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. शुक्रवारी तापमान ४0 अंशावर असतानाही भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. संत सेवालाल महाराजांचा जयघोष यावेळी करण्यात आला. या ठिकाणी बांधण्यात आलेल्या ह्यभक्तिधामह्णमध्ये संत सेवालाल महाराज यांच्या अडीच किलो सोन्याच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली तसेच कर्नाटकमधील संत हमुलाल महाराज यांचे मंदिर या ठिकाणी बांधण्यात आले आहे. येथे बंजारा समाजातील दोन्ही संतांचे मंदिर बांधल्यामुळे भक्तिधाम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरले. भक्तिधाम बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे स्वच्छता अभियान कार्यालयाची स्थापना केली. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यपालन अधिकारी गणेश पाटील, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, दिनेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव, डॉ. श्याम जाधव, राजेश निवल आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. रणजित पाटील, खा. भावना गवळी, आ. राजेंद्र पाटणी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशासनाची चोख व्यवस्था यात्रेत दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून भाविक दाखल झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने २00 स्वयंसेवकांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला.