शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथील ‘कोरोना’ रुग्णालयात सुविधांचा अभाव; रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:53 IST

कारंजा येथील कोरोना रुग्णालयात मात्र कोरोनाच्या रुग्णांसाठी सडक्या गाद्या वापरात आणल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : कोरोना विषाणूच्या संसर्गाने राज्यभरात हाहा:कार माजला आहे. या पृष्ठभुमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असताना कारंजा येथील कोरोना रुग्णालयात मात्र कोरोनाच्या रुग्णांसाठी सडक्या गाद्या वापरात आणल्या आहेत. आरोग्य विभागाच्या या  कारभाराप्रती सर्वच स्तरातून रोष व्यक्त होत आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभुमीवर कारंजा ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना संदिग्ध व बाधित रुग्णांसाठी ५० बेडची व्यवस्था केली. येथे नवीन गाद्या आणि बेडशीट, ब्लँकेट मिळणे गरजेचे होते. असे असताना जिल्हास्तरावरून आरोग्य विभागाने ३० निकृष्ट दर्जाच्या गाद्या पाठविल्या. पलंग तर एकही मिळाला नाही. ठिकठिकाणी फाटलेल्या आणि मळलेल्या गाद्यांवर रुग्णांना झोपवून इलाज करणार का, असा संतप्त सवाल आमदार राजेंद्र पाटणी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

डॉक्टरांचे ‘अपडाऊन’!कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच राहणे बंधनकारक करण्यात आले; मात्र कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत डॉ. मधुकर मडावी हे ‘रेड झोन’ असलेल्या नजिकच्या यवतमाळ जिल्ह्यातून; तर डॉ. जयंत पाटील हे अकोला येथून ‘अपडाऊन’ करतात.

वाशिमनंतर कारंजा येथे कोरोना रुग्णांसाठी ५० खाटांचे रुग्णालय कार्यान्वित झाले. कोरोनासंदर्भात सद्य:स्थिती अत्यंत गंभीर असताना त्याठिकाणी कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. किमान ५० नवीन गाद्या, बेडशीट आणि ५० सुस्थितीमधील पलंग असायला हवे होते. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांनी आश्वासन देऊनही ते पाळले नाही. आरोग्य सुविधेसंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक हे गंभीर नसल्याने जिल्ह्यात आरोग्य सेवा कोलमडत आहे.

- राजेंद्र पाटणीआमदार, कारंजा 

नवीन गाद्या, पलंगांकरिता पुरेसा निधी नसल्यामुळे जुन्या गाद्यांचा वापर करावा लागत आहे. शासनाकडून यासाठी निधी प्राप्त झाल्यास नवीन साहित्य पुरविण्यात येईल. रुग्णांना पुरविण्यात येणाºया सेवा-सुविधांबाबत आरोग्य विभाग दक्ष आहे.- डॉ. अंबादास सोनटक्केजिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

टॅग्स :Karanjaकारंजाcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल