शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वळणमार्गावर गतिरोधकाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:30 IST

शेलूबाजार -वाशिम मार्गावरील गोगरी ते पिंप्री खुर्द फाट्यादरम्यान धोकादायक वळण आहे. अनेक वाहनांना पलटी होण्यासाठी निमंत्रण देणाऱ्या या ...

शेलूबाजार -वाशिम मार्गावरील गोगरी ते पिंप्री खुर्द फाट्यादरम्यान धोकादायक वळण आहे. अनेक वाहनांना पलटी होण्यासाठी निमंत्रण देणाऱ्या या धोकादायक वळणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना असतानाही नव्याने नूतनीकरणाच्या वेळी पाहिजे त्या प्रमाणावर या वळणाची दुरुस्ती झाली नाही. कठडे लावल्यानंतर अनेक वाहने त्या कठड्याला भेदून अपघातग्रस्त झाली, असे तुटलेल्या कठड्यावरुन दिसून येते. दुसरी बाब म्हणजे चिखली ते पिंप्री अवगण हे ९ किमी अंतर हा सिंगल रस्ता अन्‌ पिंप्री ते वाशिम हा दुहेरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या निर्माती नंतर सदर मार्गावर प्रचंड वाहतूक वाढली आहे. अकोला येथून वाशिम तथा हिंगोली नांदेड जाणारे वाहनधारक याच मार्गाचा अवलंब करत आहेत; परंतु चिखली ते पिंप्री अवगणपर्यंतचा एकेरी रस्ता वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या अरुंद रस्त्यावर बाजू घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात रस्त्याच्या कडा भरताना गिट्टीचा वापर करण्यात आला आहे. त्या गिट्टीमुळे वाहने पंक्चर होण्याचे प्रमाण वाढले आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

..

विद्युतीकरणाचे काम अर्धवट

या रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गावात सिमेंट रस्ते व दोन्ही बाजूंनी नाल्या आणि विद्युतीकरण करण्यात आले आहे. यामध्ये माळेगाव व पिंप्री अवगण ही दोन गावे आहेत. पिंप्री अवगण येथे गावाच्या हद्दीपर्यंत दोन्ही बाजूंनी नाली व विद्युतीकरण करणे गरजेचे होते; मात्र काही विशिष्ट अंतरापर्यंतच नाल्या व विद्युतीकरण करण्यात आले. काही भागातील लोकवस्तीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने अर्धवट कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.