शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी स्थापन होणार ‘कोविड हेल्पलाईन पथक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:31 IST

दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकानेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासन, प्रशासनातर्फे केले जाते. ...

दुसरी लाट ओसरत असली तरी धोका अजून संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकानेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन शासन, प्रशासनातर्फे केले जाते. दरम्यान, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून यापुढे वाशिमसह राज्यातील ग्रामीण भागात कोविड हेल्पलाईन पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकात गावातील खासगी डॉक्टरसह प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांच्यासह स्थानिक कर्मचाऱ्यांचा सहभाग राहणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना आवश्यक ते उपचार तातडीने डॉक्टरांचे सहाय्य घेऊन चालू करण्यास मदत करणे, रुग्णांची वेळोवेळी तपासणी करणे व आवश्यक तपासण्या नाममात्र दरात करणे, आवश्यकता असलेल्या रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य रुग्णालयात भरती करणे, रुग्ण अ‍ॅडमिट करताना बेडच्या उपलब्धतेबाबत व उपचारादरम्यान औषधांच्या कमतरतेबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे, विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी आणि इतर बाबींचा आढावा घेणे, कोरोनानंतर म्युकरमायकोसिस किंवा अन्य आजारांची लक्षणे आढळून येत आहेत का याची माहिती घेण्याचे काम या पथकातील सदस्यांना करावे लागणार आहे.