मानोरा : हातगाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादात युवकाच्या उजव्या हातावरच्या पंज्यावर चाकु मारून त्यास जखमी करण्यात आल्याची घटना ६ एप्रिलला सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.अगदीच क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेप्रकरणी नागेश वानखडे यांनी पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश डहाके, प्रकाश गावंडे (रा.आमगव्हाण, ता. मानोरा) यांच्याविरुध्द भादंविचे कलम ३२४, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. बीट जमादार सुभाष महाजन, संदीप करोची या प्रकरणाचा पुढील तपास करित आहेत.
युवकावर चाकू हल्ला!
By admin | Updated: April 7, 2017 00:01 IST