पोहरादेवी परिसरात काल रात्री सोसाट्याचा वारा आणि काही भागात गारपीट झाल्याने पोहरादेवी, उमरी खुर्द या वाईगौळ ते धानोरा या रस्त्यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्दला येजा करणाऱ्या नागरिकांना प्रचंड चिखलामुळे अडचणींचा सामना करावा लागला.
भक्तिधाम या मंदिराशेजारी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने संबंधित रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या विभागाने पाणी साचू नये यासाठी ठोस उपाययोजना न करता मातीमिश्रित मुरूम टाकल्याने मोठ्या प्रमाणात चिखल या रस्त्यावर झालेला निदर्शनास आला.
तीर्थक्षेत्र पोहरादेवी व उमरी खुर्द येथे येणारे भाविक तथा शेतकरी व इतर नागरिकांना या चिखलामुळे मोठी कसरत करावी लागली व या चिखलाने अपघात होण्याचाही धोका निर्माण झालेला आहे.