शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमसाठी सरसावले दानशुर; शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 14:36 IST

आता ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार मिळाला आहे. 

ठळक मुद्देतालुक्यातील लाठी येथील भानुदास सुर्वे यांचा १७ वर्षीय मुलगा मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असताना त्याच्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने हताश झाले होते.लोकमतनेही ३० जानेवारीच्या अंकात लोकमत मदतीचा हात या सदरांतर्गत ‘मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन केले. आता ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार मिळाला आहे. 

- नाना देवळे 

मंगरुळपीर : तालुक्यातील लाठी येथील भानुदास सुर्वे यांचा १७ वर्षीय मुलगा मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रस्त असताना त्याच्यावर उपचारासाठी पैसे नसल्याने हताश झाले होते. यासाठी त्यांनी समाजातील दानशुरांना मदतीची हाक दिली. लोकमतनेही ३० जानेवारीच्या अंकात लोकमत मदतीचा हात या सदरांतर्गत ‘मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना मदतीचे आवाहन केले. आता ओमच्या मदतीला काही दानशूर सरसावले असून, त्याच्यावरील शस्त्रक्रियेच्या खर्चासाठी मोठा हातभार मिळाला आहे. 

मंगरुळपीर तालुक्यातील लाठी येथील रहिवासी भानुदास सुर्वे हे अठराविश्वे दारिद््रयात मोलमजुरी करून कुटुंंबाचे उदरभरण करतात. त्यांच्या ओम  १७ वर्षीय मुलास गेल्या दोन वर्षांपासून मुत्रपिंडाच्या दूर्धर आजाराने ग्रासले आहे. हे कळल्यानंतर भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी अर्थात ओमचे गरीब मातापिता हताश झाले. तथापि, त्यांनी मोलमजुरी करीत पोट उपाशी ठेवून ओमवर उपचार केले. त्यासाठी नातेवाईकांकडून मदत घेण्यासह हातउसणवारीही केली आधि चार वेळा त्याच्यावर वर्धा, वणी आणि अकोला येथे चार वेळा शस्त्रक्रियाही केल्या; परंतु ओमच्या दुदैर्वाने त्या चारही शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्या होत्या. त्यामुळे त्याच्यावरील पुढील उपचारासाठी एक लाखाहून अधिक रुपयांची गरज होती; परंतु त्याचे भानुदास सुर्वे आणि त्यांच्या पत्नी भूमिहीन शेतमजूर एवढी मोठी रक्कम जुळवू शकत नव्हते. पोटच्या गोळ्याचा वाढता आजार पाहून त्यांच्या डोळ्यात सतत अश्रू अनावर होत असायचे. त्यांची ही केविलवाणी व्यथा कळल्यानंतर लोकमतच्यावतीने ३० जानेवारीच्या अंकात मुत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त ओमला हवी दानशुरांची मदत या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून दानशुरांना त्यांच्यावतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. याची दखल घेत अकोला येथील महावितरणचे अधिकारी संतोष खुमकर या दानशूर व्यक्तीने २१ हजार रुपयांचा धनादेश ओमवर उपचार करणाºया रुग्णालयाच्या नावे दिला. दरम्यान, ओमच्या माता-पित्याच्या आवाहनानंतर शेलूबाजार येथील रुग्णसेवा युवा ग्रुपने १५ हजार, लाठीवासियांनी १५ हजार ९००, जय बजरंग मित्रपरिवार शेलूबाजारने ११ हजार, बाळासाहेबर ठाकरे जयंतीनिमित्त शिवसेना शेलुबाजारने ७६०० रुपये, जिल्हा मध्यवर्ती बँक अकोलाच्यावतीने २१ हजार, तसेच मंगरुळपीर येथील एका नागरिकाने ८०० रुपयांची मदत केली आहे. या सर्वांचे ओमच्या मातापित्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.  

टॅग्स :washimवाशिम