शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा लाड : राहत्या जागेचा नमुना ‘ड’ द्या : माहुरवेस परिसरातील नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 22:30 IST

वाशिम: सरकारी जागेवरील राहत्या घराची नोंद होवून जागेचा ‘नमुना ड’ देण्याची मागणी शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे १५ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिका-यांना दिले निवेदनलहुशक्ती सेनेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सरकारी जागेवरील राहत्या घराची नोंद होवून जागेचा ‘नमुना ड’ देण्याची मागणी शहरातील माहुरवेस परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी जिल्हाधिका-यांकडे १५ जानेवारी रोजी निवेदनाव्दारे केली आहे. लहुशक्ती सेनेच्या नेतृत्वात जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की वाशिममधील जुन्या हिंगोली नाक्याजवळ असलेल्या माहुरवेश रावणदहन मैदानात जवळपास ४० ते ५० वर्षांपासून बेघर लोक सरकारी जमिनीवर कच्ची घरे बांधून राहत आहेत. ते नगर परिषदेकडून आकारला जाणारा कर दरवर्षी न चुकता अदा करतात. सदर जागेची असेसमेंट नक्कल सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत, परंतू नझुल कार्यालयात या घरांची नोंद अद्याप झालेली नाही. पंतप्रधान घरकुल योजना व रमाई आंबेडकर घरकुल योजनेकरीता राहत्या जागेवर घरकुल बांधून मिळण्यासाठी नमुना ड ची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे राहत्या घराचा त्वरीत सर्वे होवून संबंधित कार्यालयात आमच्या घराची नोंद होवून ‘ड नमुना’ मिळण्यात यावा. याशिवाय वाशिम जिल्हयात संपूर्ण ग्रामीण भागात व शहरातील काही भागात सुध्दा वरील परिस्थितीचा सर्वे करुन संबंधित कार्यालयात तशी नोंद होवून ड नमुना मिळावा, अशी मागणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात आली. जिल्हाधिका-यांना निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कांबळे, उपाध्यक्ष मोहनराज दुतोंडे, अनिल रणबावळे, सुनील दळवे, दिपक साठे, सुमन गायकवाड, शोभना सावळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमcollectorतहसीलदार