लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती १२ जानेवारी रोजी जिल्हाभरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
निवासी मूकबधिर विद्यालय अनसिंग
अनसिंग: येथील निवासी मूकबधिर विद्यालयात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आर. एस. वाघ, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक एन. एस. कोल्हे उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन आर. आर. खवले यांनी, तर आभार प्रदर्शन जी. आर काळबांडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
=-------
जि.प. शाळा तोरणाळा
इंझोरी: येथून जवळच असलेल्या तोरणाळा येथील जिल्हा परिषद शाळेत राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आठवले, मेश्राम, मदतनीस अमोल ढवळे, सुमित्रा राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी वैभव दहापुते हे उपस्थित होते. मुख्याध्यापकांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
^^^^^
राजस्थान माध्यमिक विद्यालय रिसोड
रिसोड : येथील राजस्थान माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे, तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक भक्तिदास सुर्वे, अनिल नंद कुले, अमोल भेंडे, आनंदा पुंड, विनोद चरखा, श्रीराम कंठाळे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थी अंकुश गव्हाणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाकरिता अनिल अवचार, अनिल मुंडे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
120121\12wsm_3_12012021_35.jpg
===Caption===
जिल्हाभरात जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात