शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

उपवासाला साबुदाणा न खाल्लेलाच बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:45 IST

वाशिम : ऐन सणासुदीच्या काळात महागाईने डोके वर काढले आहे. उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढताच, किमतीचा भडका उडाला. साबुदाणा, भगर ...

वाशिम : ऐन सणासुदीच्या काळात महागाईने डोके वर काढले आहे. उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढताच, किमतीचा भडका उडाला. साबुदाणा, भगर आदींच्या किमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे साबुदाणा हा पचनास अतिशय जड असतो. त्यामुळे साबुदाण्याचे सेवन केल्यामुळे पचनसंस्थेवरही मोठ्या प्रमाणात ताण पडतो.

०००००००००००००००००००

उपवासाच्या पदार्थांचे दर (प्रतिकिलो)

प्रकार १० जुलै १० ऑगस्ट

भगर १०० ११०

साबुदाणा ६० ८०

नायलॉन ७५ ९५

साबुदाणा

०००००००००००००००००

दर का वाढले

सणासुदीच्या काळात फळे, उपवासाच्या पदार्थांना अधिक मागणी असते. मागणीच्या तुलनेत पुरेशा प्रमाणात पुरवठा नसल्याने पदार्थांचे दर वाढतात. यंदाही साबुदाणा, भगर, नायलॉन साबुदाणा, विविध प्रकारच्या फळांच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येते.

००००००

साबुदाणा आरोग्याला हानिकारक!

साबुदाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणमूल्य अतिशय कमी आहे. साबुदाण्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात, तर अतिशय अल्प प्रमाणात प्रथिने असतात. शिवाय काही थोड्या प्रमाणात क्षार आणि जीवनसत्त्वसुद्धा असतात. साबुदाणा हा पचनास अतिशय जड असल्याने पचन संस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण पडतो. अर्धवट शिजवलेला साबुदाण्याचे सेवन केले तर पोट दुखते, गॅसेस तयार होतात, भूक लागत नाही, बद्धकोष्ठताचा त्रास होतो.

०००००००

उपवास आहे, मग हे पदार्थ खा

कोट

उपवासाला दूध, दही, ताक, ताजी फळे, ताज्या फळांचा ज्यूस, पनीर, बदाम, अक्रोड, पिस्ता, कच्च्या भाज्या, शिंगाड्याचे थालीपीठ आदी पदार्थ योग्य असतात. उपवासाला आहारास पूर्ण विश्रांती देणे योग्यच ठरेल. केवळ दूध व पाणी घेणे उत्तम.

-सुनीता लाहोरे,

आहारतज्ज्ञ, वाशिम

००००००००