आसेगाव पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कासोळा येथील फिर्यादी सत्यभामा गोकूळ राठोड (५८) यांनी फिर्यादीत असे नमूद केले आहे की, फिर्यादीचा मुलगा महादेव गोकूळ राठोड हा २४ जुलै रोजी रात्री घरात टीव्ही पाहत असताना आरोपी आनंद नंदू घोडके, नंदू विठ्ठल घोडके, विष्णू रामदास घोडके, जय परमेश्वर भोसले, अर्चना परमेश्वर परमेश्वर भोसले सर्व रा. कासोळा, ता. मंगरुळपीर यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादीचा मुलगा महादेव गोकूळ राठोड याच्या डोक्यावर लोखंडी सबलीने मारहाण करून जखमी केले, तसेच फिर्यादीस थापड, बुक्क्याने मारहाण करून शिवीगाळ केली, अशा लेखी तक्रारीवरून पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३२४, ३२३, ५०४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.
इसमास लोखंडी सळीने मारून केले गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST