शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन ‘विहिरीं’चा लेखाजोखाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 15:53 IST

वाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतर सदर विहीर अस्तित्वात आहे की नाही यासह अन्य बाबींचा अद्ययावत लेखाजोखाच रोजगार हमी योजना विभागाकडे नसल्याची बाब समोर आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकामासाठी अनुदान दिल्यानंतर सदर विहीर अस्तित्वात आहे की नाही यासह अन्य बाबींचा अद्ययावत लेखाजोखाच रोजगार हमी योजना विभागाकडे नसल्याची बाब समोर आली आहे. शेतकºयांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विविध योजनेंतर्गत सिंचन विहीर दिली जाते. सहस्त्र सिंचन विहीर योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंब, स्त्री कर्ता प्रधान कुटुंब, दिव्यांग, जमिन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, याप्रमाणे लाभार्थींची निवड केली जाते. या योजनेंतर्गत सहा हजार विहिरींचे उद्दिष्ट आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या विहिरीला पाणी लागले की नाही, विहिर अस्तित्वात आहे की नाही,  विहीर बुजविण्यात आली का, विहिरींवर विद्युत पंप बसविण्यात आले की नाही, यासंदर्भातील अद्ययावत लेखाजोखा असणे अपेक्षीत आहे. गत चार वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सिंचन विहिरींपैकी किती विहिरींना पाणी लागले व किती विहिरींवर विद्युत पंप बसविण्यात आले, विहीर अस्तित्वात आहे की नाही याची अद्ययावत माहिती संकलित करण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागाकडे पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध नसल्यानेदेखील माहिती संकलित करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जाते. 

जिल्हा परिषद प्रशासनाने मागविली माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने सिंचन विहिरींसंदर्भात गावनिहाय अद्ययावत माहिती मागविली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सिंचन विहिरींपैकी किती विहिरींना पाणी लागले व किती विहिरींवर विद्युत पंप बसविण्यात आले, याची गावनिहाय माहिती सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने गटविकास अधिकाºयांना दिलेल्या आहेत. यामुळे शासकीय अनुदान घेतलेल्या किती विहिरींतून प्रत्यक्ष सिंचन होत आहे, याची माहिती समोर येणार आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद