शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेला कोलदांडा देणाऱ्यां पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:32 IST

पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड: मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे नियमित ग्रामसभा होत नसल्याच्या तक्रारी ग्रामपंचायतकडून गटविकास अधिकाºयांकडे करण्यात येत होत्या. या संदर्भात लोकमतने ६ सप्टेंबर रोजी पार्डी ताड येथे वर्षभरापासून ग्रामसभाच नाही. या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेऊन पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांनी पार्डी ताड ग्रामपंचायतची चौकशी केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. पार्डी येथील ग्रामपंचायतच्या सचिवांनी आॅगस्ट २०१७ मध्ये प्रभार घेतल्यापासून ग्रामसभेचे आयोजन केले नाही, तसेच ते गावात नियमित येत नाहीत. मासिकसभेलाही उपस्थित राहत नाहीत. ग्रामपंचायत अधिनियमानुसार एका वर्षात २६ जानेवारी, १५ आॅगस्ट, १ मे आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करणे आवश्यक असताना वर्षभरात एकही ग्रामसभा घेतली नाही. त्यामुळेच गावात तंटामूक्ती अध्यक्षाची निवड होऊ शकली नाही, अशा प्रकारची तक्रार ग्रामस्थांच्यावतीने पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे करण्यात आली होती. या संदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करून पंचायत समितीचे लक्ष वेधले असता. गटविकास अधिकाºयांनी विस्तार अधिकारी पद्मने यांच्यामार्फत २५ सप्टेंबर रोजी या प्रकाराची चौकशी करीत ग्रामपंचायत सरपंच व्ही. आर. लांभाडे, ग्रामसचिव पी. एस. मनवर, तसेच पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे यांचे बयाण नोंदविले. सरपंच, सचिव आणि ग्रामस्थांच्या बयाणात विरोधाभासपार्डी ताड येथील ग्रामसभेबाबत केलेल्या चौकशीदरम्यान विस्तार अधिकाºयांनी ग्रामपंचायत सरपंच आणि सचिवांसह ग्रामस्थांचे बयाण नोंदवून घेतले. त्यामध्ये विरोधाभास दिसून आला. सचिवांनी १५ आॅगस्ट रोजी त्यांच्याकडे चांभईचा प्रभार असल्याने पार्डी ताड येथे सभा घेतली नसल्याचे; परंतु २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा घेतल्याचे नमूद केले, तर सरपंचांनीही २३ आॅगस्ट रोजी १२२ ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभा झाल्याचे नमूद केले, तर  पांडुरंग लांभाडे, मारोती जटाळे आणि मंगेश लांभाडे या तिन्ही ग्रामस्थांनी २३ आॅगस्ट रोजी ग्रामसभा झालीच नसल्याचे बयाणात नममद केले आहे. विशेष म्हणजे या तिघांची हजेरी पटावर स्वाक्षरी असली तरी, त्यातील दोघांनी ती आपली स्वाक्षरी नसल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत