शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, सोयाबीनवर रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 20:22 IST

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  अशा आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची  भिती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देसोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव कपाशीच्या उत्पादनावर परिणाम शेतक-यांमध्ये भिती 

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  अशा आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. तर सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची  भिती शेतकºयांमध्ये व्यक्त केली जात आहे.दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधीत शेतकºयांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे असतांना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता.  मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी मारली.  अधुनमधुन आलेल्या रिमझीम पावसाने पिकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी झाली. मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमीनीला भेगा पडल्या होत्या तसेच जमीनीतील तापमानातही मोठी वाढ झाली. परिणामी सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक किडी यांच्यासह आदि रोगांनी  आक्रमण केले आहे. त्यामुळे त्याची पाने सुकु लागली आहे. तर सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठ्या प्रमाणावर फस्त करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनवर फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव होत नाही. मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी विभागाशी शेतकºयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.