शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय अनुदान देण्याचे निर्देश

By admin | Updated: August 4, 2016 02:03 IST

मानोरा तालुक्यातील २00 लाभार्थ्यांना २४ लाख रुपये अनुदान देण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिका-यांचे आदेश.

वाशिम,दि. ३- नगर पंचायत स्थापनेपूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या मानोर्‍यातील २00 लाभार्थींना तातडीने २४ लाखांचे अनुदान वितरण करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी मानोरा गटविकास अधिकार्‍यांना मंगळवारी दिले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम पूर्ण करणार्‍या लाभार्थीला १२ हजार रुपये अनुदान दिले जाते. मानोरा ग्रामपंचायत असताना, शहरातील २00 लाभार्थिंनी शौचालय बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर मानोरा नगर पंचायत अस्तित्वात आली. दरम्यान, शौचालय अनुदानाची रक्कम कुणी द्यावी? असा प्रश्न निर्माण झाला. नगर पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने अनुदानाची रक्कम जिल्हा परिषद प्रशासनाने द्यावी, अशी भूमिका नगर पंचायत प्रशासनाने घेतली. जिल्हा परिषद सदस्य हेमेंद्र ठाकरे यांनी याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. मानोरा ग्रामपंचायत असताना शौचालय बांधकाम पूर्ण झाल्याने २00 लाभार्थींचे प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान याप्रमाणे २४ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावे, अशी भूमिका हेमेंद्र ठाकरे यांनी सर्वसाधारण सभेत मांडली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील व जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्याशी चर्चेअंती २00 लाभार्थींसाठी २४ लाखांचे अनुदान दोन महिन्यांपूर्वीच देण्यात आले. तथापि, अनुदान वितरणास दिरंगाई झाली. यासंदर्भात सोमवारी ठाकरे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याशी अनुदान दिरंगाईचा मुद्दा उपस्थित केला. या पृष्ठभूमीवर संबंधित २00 लाभार्थींना तातडीने अनुदान वितरण करण्याचे निर्देश मानोरा गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले.