शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य उघडलेले पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 17:24 IST

वाशिम - जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अमरावती विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ७ मे रोजी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी, आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी अमरावती विभागातील पाचही मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना ७ मे रोजी दिले आहेत. शासन निर्णय २ जुलै २०१३ आणि २८ आॅगस्ट २०१५ अन्वये जि.प.शाळांना अंतराची अट पाळून इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करता येतात. परंतू, अंतराची अट न पाळता तसेच अन्य बाबींची पुर्तता न करताच काही ठिकाणी नियमबाह्य वर्ग जोडण्यात आल्याची बाब  शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी प्राथमिक शिक्षण संचालक सुनिल चौहान यांच्या निदर्शनात आणून दिली होती. जि. प. शाळांजवळ पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसताना तसेच प्रयोगशाळा, गणित व विज्ञान शिक्षकांचा अभाव असतांना काही ठिकाणी पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते.  २ जुल २०१३ च्या शासननिर्णयात स्पष्ट उल्लेख आहे की, अंतराची अट लक्षात घेता ज्या ठिकाणी शिक्षणाची सोय नसेल त्याच ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था करावयाची आहे. पण काही ठिकाणी चुकीचा अर्थ घेऊन सरसकट वर्ग सुरु केले आहेत, ही बाबही भोयर यांनी निदर्शनात आणून दिली होती. कायद्याच्या चौकटीत राहुन फक्त नियमबाह्य असलेले अनधिकृत वर्ग बंद करावे, अशी मागणी शिक्षण संचालकांकडे केली होती. या पृष्ठभूमीवर जिल्हा परिषद शाळांनी अंतराची अट न पाळता नियमबाह्य उघडलेले इयत्ता पाचवी व आठवीचे वर्ग बंद करण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालक चौहान यांनी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत.

टॅग्स :washimवाशिमEducation Sectorशिक्षण क्षेत्र