शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गायब विहीरप्रकरणी चौकशी; लाभार्थी, ग्रामसेवकांचे बयान घेतले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 15:20 IST

देगाव, उमरा कापसे येथील शेतशिवारातील ‘त्या’ नियोजित ठिकाणी सिंचन विहीरच अस्तित्वात नसल्याची  बाब ‘लोकमत’ने २४ जुलै रोजी उघडकीस आणली होती.

ठळक मुद्देउपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी यासंदर्भात लाभार्थी व ग्रामसेवकांचे बयान घेतले आहे. पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांकडे सदर प्रकरण लवकरच ठेवले जाणार आहे.

- संतोष वानखडे वाशिम :  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत १.६० लाख रुपयांचे अनुदान घेतल्यानंतरही देगाव, उमरा कापसे येथील शेतशिवारातील ‘त्या’ नियोजित ठिकाणी सिंचन विहीरच अस्तित्वात नसल्याची  बाब ‘लोकमत’ने २४ जुलै रोजी उघडकीस आणली होती. त्यानंतर जिल्हास्तरावरून जलदगतीने तपासाची चक्रे फिरली असून, लाभार्थी व ग्रामसेवकांचे बयान घेण्यात आले. रोहयो कक्षाच्या उपजिल्हाधिकाºयांच्या अहवालासह सदर प्रकरण लवकरच जिल्हाधिकाºयांच्या दरबारात पुढील कार्यवाहीसाठी ठेवले जाणार आहे.शेतीला सिंचनाची जोड मिळावी यासाठी विविध योजनेंतर्गत विहीर बांधकामासाठी दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिर बांधकामासाठी एकूण तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थीला विहिरीचा लाभ मिळाल्यानंतर मजूरांद्वारे विहीर बांधकाम करणे बंधनकारक आहे. वाशिम तालुक्यातील गट ग्रामपंचायत असलेल्या देगाव, उमरा कापसे येथील शेतशिवारात एका लाभार्थीला विहीर मंजूर झाल्यानंतर, प्रस्तावात नमूद केलेल्या ठिकाणी विहीर बांधकाम करणे बंधनकारक होते.  देगाव येथील एका लाभार्थीला विहीर बांधकामासाठी प्रशासनाने आतापर्यंत १.६० लाख रुपयांच्या आसपास अनुदान दिले. मात्र, त्या नियोजित ठिकाणी विहीरच नसल्याची बाब समोर आली. ‘लोकमत’ने  २४ जुलै रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. रोजगार हमी योजना कक्षाचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांनी यासंदर्भात लाभार्थी व ग्रामसेवकांचे बयान घेतले आहे. उपजिल्हाधिकाºयांच्या अहवालासह याप्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांकडे सदर प्रकरण लवकरच ठेवले जाणार आहे. याप्रकरणात नेमकी काय कार्यवाही केली जाणार? याकडे लक्ष लागून आहे.

 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेली विहीर देगाव येथील नियोजित ठिकाणी आढळून आली नाही.  आतापर्यंत या विहीर बांधकामासाठी दीड लाखापर्यंत अनुदानही देण्यात आले. याप्रकरणी संबंधित लाभार्थी, ग्रामसेवकांचे बयाण घेण्यात आले आहे. माझ्या अहवालासह लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी ठेवले जाईल.- सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजनाWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय