मालेगाव : एकेकाळी मालेगाव शहर गणपती व गणपतीच्या वेळेचे सुंदर प्रबोधनात्मक देखावे पाहण्यासाठी प्रसिद्ध होते. काळाच्या ओघात ही प्रथा लोप पावत जात असताना समाजाला आवश्यक असणार्या मालेगावकरांच्या जिव्हाळय़ाचा विषय असणार्या गोष्टीतून फ्लेक्स, देखाव्यातून समाज जागृती करण्याचे काम शिवाशक्ती गणेश मंडळाच्या माध्यमातून केल्या जात आहे.मालेगाव शहरात २0 गणेश मंडळांनी स्थापना करण्यात आली. त्यामध्ये शहरातील ग्रा. प.कार्यालयाच्या समोर शिवाशक्ती गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या समाजात हव्यासापोटी वंशाला दिवा मिळण्यार्या खोट्या अट्टहासामुळे सर्रास गर्भपात करण्यात येतो. त्यामुळे सगळय़ाच समाजात मुलींचे अल्प प्रमाण झाले आहे. त्यामुळे गर्भनिदान करून पोटातच त्या स्त्री अर्भकाची हत्या करण्याचे प्रमाण वाढल्याने ते रोखण्यासाठी मंडळाने जनजागृती केली आहे. आईला उद्देशून वडील पती, मित्र या सर्वांना उद्देशून सांगितले आहे की, सर्वांना आई लागते, बहीण पाहिजे, बायको पाहिजे, मैत्रीण पाहिजे मग मुलगी का नको? अतिशय मार्मिक, हृदयस्पश्री फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यानंतर त्या मुलीला उद्देशून लिहिले आहे की, हे मुली तू जिजाऊ हो, सावित्री हो, झाशीची राणी हो व गर्भपात करणार्यांना सोडू नकोस त्यांना शिक्षा कर.दुसर्या फ्लेक्समध्ये मालेगाव करांच्या जिव्हाळय़ाच्या विषयांसह इतर समाजप्रबोधनात्मक आकर्षक फ्लेक्स लावण्यात आले आहे. हे प्रबोधनात्मक फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधत आहे.
शिवाशक्ती गणेशोत्सव मंडळाचा ‘बेटी बचाव’चा अभिनव उपक्रम
By admin | Updated: September 7, 2014 02:56 IST