शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच बियाणे, खते देण्याचा कृषी विभागाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 16:11 IST

घरपोच खते, बियाणे देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : खरीप हंगामात खते, बियाणे खरेदीसंदर्भात शेतकºयांची गैरसोय होऊ नये तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांची कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून शासनाच्या संकेतस्थळावर मागणी नोंदविल्यास घरपोच खते, बियाणे देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शेतकºयांनी अधिक दक्षता बाळगावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शशिकरण जांभरूणकर यांनी केले.खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून शेतकºयांतर्फे शेती मशागतीची कामे केली जात आहे. काही दिवसातच खरीप पीक पेरणी सुरू होण्याचे संकेत लक्षात घेता शेतकºयांची खते, बियाण्यांसाठी जुळवाजूळव सुरू झाल्याचे दिसून येते. दरम्यान, शेतकºयांनी कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सोयाबीन हे सरळ वाण असल्यामुळे दरवर्षी नवीन बॅगचे बियाणे वापरण्याची आवश्यकता नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले. मागच्या वर्षीचे सोयाबीन उगवण शक्ती तपासून पेरता येते. उगवण शक्ती ७० टक्के असल्यास ३० किलो बियाणे एकरी वापरावे व ६५ टक्के उगवण असल्यास ३५ किलो बियाणे एकरी वापरावे, उगवण शक्ती कशी तपासावी याबाबत आपल्या गावातील कृषी सहायक, कृषी मित्र तसेच प्रगतशील शेतकरी यांच्याद्वारे प्रात्यक्षिक करून दाखविण्याची मोहीम खरीप हंगामपूर्वी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे, असे  तालुका कृषी अधिकारी जांभरूणकर यांनी सांगितले. बियाण्याची उगवण शक्ती तपासण्याबाबतअडचण, शंका असल्यास आपल्या गावातील कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधा.  तसेच कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी बाजारात येण्याचे टाळा, आपणास लागणाº्या बियाणे, खताची मागणी शासनाच्या संकेतस्थळावर नोंदविल्यास  आपणास  घरपोच बियाणे व खते रास्त दरामध्ये आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रा मार्फत पोहचविल्या जातील. खते व बियाणेची मागणी कशी करावी यासाठी कृषी सहायक, कृषी मित्र, प्रगतशील शेतकरी यांची मदत घ्यावी, असे जांभरूणकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती