शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बुद्ध विहारांच्या समन्वयासाठी माहिती संकलनाची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 16:04 IST

मालेगाव : राज्यातील गाव, शहर व हर-महानगरांतील लहान-मोठ्या सर्व बुद्ध विहारांचा समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक समयबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार बुद्ध विहारांची माहिती संकलित केली जात आहे.

ठळक मुद्दे  समयबद्ध कार्यक्रम बुद्ध विहार समन्वय समिती गठीत

मालेगाव : राज्यातील गाव, शहर व हर-महानगरांतील लहान-मोठ्या सर्व बुद्ध विहारांचा समन्वय ठेवण्याच्या दृष्टिकोनातून एक समयबद्ध कार्यक्रम आखून त्यानुसार बुद्ध विहारांची माहिती संकलित केली जात आहे. वाशिम जिल्ह्यात नालंदा विहार वाशिमचे मिलिंद उके व धम्मस्थान स्तूप, मालेगावचे  सुधाकर पखाले यांचेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

सन २०१४ ते २०२० या सात वर्षाचे नियोजन करून नागपूरला एक बुद्ध विहार समन्वय समिती अस्थायी स्वरूपात गठन करण्यात आली. या समिती मार्फत मे २०१५, एप्रिल २०१६ आणि फेब्रुवारी २०१७ ला दरवर्षी नागपूरचे पूज्य भदंत विमलकिर्ती गुणसारी यांच्या मार्गदर्शनात जवळपास ४१६ विहारांच्या संचालक मंडळ प्रतिनिधीच्या परिषदा घेण्यात आल्या आहेत. येणाºया २०१८ या वर्षात जवळपास १०, ००० विहार प्रतिनिधींची परिषद घेण्याचा मानस या समन्वय समितीचा आहे. पुढे सन २०२० पर्यंत ही संख्या १०, ००० विहारांच्या समन्वयासाठी जनमत तयार करण्याचे व त्यातून बौद्धांच्या विविध संघटनांची शिखर संघटना ठरावी अशी बुद्ध विहार समन्वय समिती निर्माण करण्याचा मनोदय आहे. समितीतर्फे त्यांची माहिती आणि डिसेंबर २०१७ ला होत असलेल्या पाली भाषा परीक्षेची माहीती देण्यासाठी नुकतेच वाशिमच्या नालंदा नगर बुद्ध विहारात एक दिवसाचे शिबीर पार पडले. यावेळी या प्रकल्पाचे प्रवर्तक व आधार स्तंभ अशोक सरस्वती बोधी व शुद्धोधन बडवने (नागपूर) यांनी मार्गदर्शन केले. 

वाशिम जिल्ह्यातील ज्या गावांत बुद्ध विहार अस्तित्वात आहेत, तेथील विहार कमेटीचे दोन क्रियाशील प्रतिनिधी सभासदांची माहिती एकत्र करण्याची जबाबदारी नालंदा विहार वाशिमचे मिलिंद उके व धम्मस्थान स्तूप, मालेगांवचे  सुधाकर पखाले यांचेकडे सोपविण्यात आली आहे. 

गावांगावांत कार्यरत असणाºया विहार पदाधिकाºयांच्या प्रतिनिधींनी संबंधितांशी संपर्क साधून एक मोफत फॉर्म लवकरात लवकर भरून जमा करण्याचे आवाहन सुधाकर पखाले,  सुभाष खिल्लारे व सदधम्म प्रचार केंद्र यांनी केले आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिक