शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतींना मूलभूत सुविधांची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:41 IST

वाशिम : जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारतीच्यावतीने ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सहकार परिषदेचे आयोजन केले असून, राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

ठळक मुद्देआज सहकार परिषद परिषदेत मूलभूत सुविधांवर चर्चा होण्याची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारतीच्यावतीने ३0 ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात सहकार परिषदेचे आयोजन केले असून, राज्यभरातील सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’तील असुविधा आणि उद्योगांची वानवा या विषयावरही मंथन व्हावे, अशी अपेक्षा लघू उद्योजक बाळगून आहेत.सहकार परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे मुंबईचे अध्यक्ष काका कोयटे, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. वाशिम जिल्ह्यात सहकार चळवळ रुजविण्यासाठी तसेच नवनवे उद्योग उभे राहण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) विकास होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीतील असुविधांवर नजर टाकली, तर कोणताही उद्योजक येथे उद्योग उभारण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येते. वाशिम जिल्हा निर्मितीनंतर अथवा  त्यापूर्वीही  या भागात काही अपवाद वगळता मोठे उद्योगच उभे राहू शकले नाहीत. सहकार तत्त्वावर उभे झालेले उद्योग नियोजनाचा  अभाव व अन्य बाबींमुळे  व्यवस्थित चालू शकले नाहीत. बोटावर मोजण्याइतकेच खासगी मोठे उद्योग  आजघडीला सुरू आहेत. छोट्या उद्योगाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. परिणामी, जिल्हा औद्योगिक क्षेत्रात प्रचंड  माघारला असल्याचे दिसून येते. वाशिम, कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव येथील औद्योगिक क्षेत्रात अद्याप मूलभूत भौतिक सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नसल्याचे दिसून येते. वाशिम शहरापासून  चार किलोमीटर  अंतरावर शासनाने औद्योगिक विकास क्षेत्राला मान्यता दिली. यासाठी २१९.१३ हेक्टर  क्षेत्र ताब्यात  घेतले आहे. या परिसरात पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. दळणवळणाची सुविधा नसल्याने मोठे उद्योजक वाशिममध्ये येण्यास धजावत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. मालेगाव तालुक्यासाठी एमआयडीसी क्षेत्र म्हणून अकोला ते वाशिम राज्य महामार्गावर मालेगाव शहरापासून  चार किमी अंतरावर असलेल्या अमानी येथे शासनाने लघू औद्योगिक क्षेत्रासाठी २0.८0 हेक्टर जमीन संपादित केली आहे. येथे एमआयडीसीचा सर्वांगीण विकास  झाल्यास गोडंबीचा मोठा व्यवसाय जिल्ह्यात उभा राहू शकतो. मंगरूळपीर व मानोरा येथील एमआयडीसी क्षेत्रातदेखील मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. परिणामी, जिल्ह्यात एक-दोन अपवाद वगळता मोठ-मोठे उद्योग अद्याप उभे राहू शकले नाहीत.

टॅग्स :MIDCएमआयडीसी