शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल - कुलगुरू डॉ. चांदेकर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:34 IST

कारंजा :  आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देकिसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार २३ जानेवारी रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थान दि.बी.जी.ई. सोसायटी, अकोला चे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा होते.

कारंजा :  भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आहे. विविध आक्रमणे झेलुन सुध्दा या संस्कृतीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. जगाला याचेच आश्चर्य वाटते आहे. आज संपूर्ण विश्व भौतिकतेकडे जात आहे. अशा वेळी त्यांना भारतीय संस्कृती हा मोठा आधार वाटत आहे. कारण भौतिकते सोबत भारतीय संस्कृतीने अध्यात्माचे कवच धारण केले आहे. त्यामुळे भविष्यात भारतीय संस्कृती विश्व गुरु बनेल असा विश्वास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकर यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला आहे.

स्थानिक किसनलाल नथमल गोयनका कला व वाणिज्य महाविद्यालयात मंगळवार २३ जानेवारी रोजी भारतीय संस्कृती संवर्धनामध्ये स्त्रियांचे योगदान या विषयावर एक दिवसीय विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दि.बी.जी.ई. सोसायटी, अकोला चे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा होते.  यावेळी विषेश उपस्थिती म्हणून अंजनगाव सूर्जी  येथील देवनाथ मठाचे पिठाधिष प.पू.आचार्य श्रीजितेंद्रनाथ महाराज मंचावर उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून विष्वमांगल्य सभेच्या अ.भा.संघटन प्रमुख डॉ.वृृशालीताई जोषी,तसेच बी.जी.ई सोसायटी अकोला चे कार्यकारणी सदस्य डॉ.सत्यनारायण बाहेती, अनिलजी तापडीया व महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ.विनय कोडापे आदी मान्यवर उपस्थित होते. चर्चा सत्राची विधीवत सुरुवात सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. उद्घाटनपर भाषनात कुलगुरु यांनी भारतीय संस्कृती संवर्धन व रक्षणामध्ये स्त्रियांच्या भूमीकेचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.  आचार्य श्रीजितेंन्द्रनाथ महाराज यांनी मत व्यक्ते केले .  कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.राजकुमार हेडा यांनीही या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनय कोडाप े यांनी केले. कार्य क्रमाचे संचालन डॉ.किरण वाघमारे यांनी केले तर आभार प्रा. प्रकाश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाºयांंनी प्रयत्न केले.

टॅग्स :washimवाशिम