शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान मानव समाजाचे सुरक्षा कवच - युसूफ पुंजानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 20:40 IST

भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी यांनी केले.

ठळक मुद्देयुसूफ पुंजानी यांचे प्रतिपादन संविधान सन्मान दिन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : भारतीय संविधानामुळे सर्व मानव समाजाला सुरक्षा प्रदान झाली असून भारतीय संविधान हे सर्व भारतीय समाजाला आपले अधिकार प्राप्त करून देणारे व समजामध्ये सन्मानाने जगण्याचे प्रभावी शस्त्र असल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो. युसूफ पुंजानी यांनी केले. भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २६ नोव्हेंबर रोजी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.यावेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भूमिपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संविधान दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिला उजाळा देण्यात आला. पुंजाणी म्हणाले की, संविधान निर्माण समितीचे अध्यक्ष डॉ.  बाबासाहेब  आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारत देशाला समर्पित केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सतत २ वर्ष ११ महिने १८ दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन संविधानाची निर्मिती केली. सदर संविधान २६ जानेवारी १९५० पासून अंमलात आले. भारत सरकारने बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षनिमित्त २६ नोव्हेंबर २०१५ पासून संविधान सन्मान दिवस म्हणून साजरा केला. परंतु आंबेडकरवादी जनता ही दशकापासून २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करीत आह. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची, विचारधारेची कास धरने अत्यंत आवश्यक असल्याचे पुंजाणी म्हणाले. कार्यक्रमाला कारंजा नगराध्यक्ष शेषराव ढोके, उपाध्यक्ष एम. टी. खान, नगरसेवक जुम्मा पप्पुवाले, निसार खान, सय्यद मुजाहिद एजाज शेख, जवेदोद्दीन, चंदन गणराज, अ. रशीद, सलीम गारवे, सलीम प्यारेवले, राजू इंगोले, रशीद निमसुरवाले, जाकिर शेख, भारिप-बमस तालुकाध्यक्ष भारत भगत, देवराव कटके, राजाभाऊ चव्हाण, राजू वानखड़े, देवानंद कांबळे, बबन वानखड़े, समाधान सिरसाठ, अरविंद भगत, संजय प्रगणे, शामराव कांबळे,  कौसल्याबाई मोटघरे, अ‍ॅड. कुंदन मेश्राम, अ‍ॅड. धम्मानंद देवळे, राजेश मस्के, तुळशिराम गुलदे, जि.प. सदस्य मोहन महाराज राठोड, दिलीप सावजी, अर्चना मेश्राम आदिंसह नगर परिषद सदस्य, पदाधिकारी व भारिप-बमसंच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.