शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धीची उंची, मनाची व्यापकता वाढवा! - डॉ. हेमंत खडके 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 15:14 IST

बुद्धीची उंची आणि मनाची व्यापकता वाढवा, असे भाष्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. हेमंत खडके यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  :  हे जीवन सुंदर आहे. त्यात सुख आणि दु:ख हे अपरिहार्य आहे. आपल्या जगण्यात समतोल हवा. जीवनाचा समतोल विचार हवा. त्यासाठी बुद्धीची उंची आणि मनाची व्यापकता वाढवा, असे भाष्य संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाचे अधिव्याख्याता डॉ. हेमंत खडके यांनी केले.विदर्भ साहित्य संघ शाखा वाशीमच्यावतीने आयोजित स्वर्गीय द. चिं. सोमण स्मृती व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ते १४ डिसेंबर रोजी बोलत होते. सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे शाखाध्यक्ष प्रा. हरिभाऊ क्षीरसागर होते. सुप्रसिद्ध लेखकद्वय नामदेव कांबळे आणि बाबाराव मुसळे व्यासपीठावर उपस्थित होते. 'सुखी माणसाचा सदरा' हा विषय फुलविताना डॉ. खडके यांनी रसेल, संत तुकाराम आणि गुलाबराव महाराजांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान सोप्या शब्दात मांडले. ते म्हणाले, सुख एकसारखेच असते. दु:ख मात्र हजार प्रकारचे असते. आत्यंतिक पापभिरू, आत्मलीन आणि अहंमन्य माणसे लवकर दु:खी होतात. इतरांशी स्पर्धा हे सुद्धा मानसिक तणाव वाढविणारे कष्टप्रद वास्तव आहे. केवळ पैसा आणि यशाच्या मागे लागून भावाशी, पत्नीशी स्पर्धा करणारे महाभागही आहेत. स्वत:जवळ जे आहे, त्याचा आनंद न घेता दुसºया जवळचे जे आहे, त्याचंच दु:ख आपण जास्त बाळगतो. भीतीची भीती कमी व्हावी. माणसाने सतत उत्तेजनाही शोधू नये. भूक आणि अन्न यांचे जे नाते आहे, तेच उत्साह आणि जीवनाचे आहे. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत उत्साह मिसळा, असे विवेचन त्यांनी केले. प्रा. क्षीरसागर यांचे अध्यक्षीय भाषण झाले. डॉ. संजय पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. गजानन वाघ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. मेघा देशमुख यांनी सूत्रसंचलन केले. प्राचार्य डॉ संजय चौधरी यांनी आभार मानले. थंडीची लाट असतानाही डॉ. खडके यांना ऐकण्यासाठी सभागृह श्रोत्यांनी तुडुंब भरले होते.

टॅग्स :washimवाशिमcultureसांस्कृतिक