शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मोफत ॲडमिशनसाठी आस्तेकदम; सहा दिवसांत एकही प्रवेश नाही

By दिनेश पठाडे | Updated: April 18, 2023 14:02 IST

शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९९ शाळांनी  नोंदणी केली.  

वाशिम : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी ॲडमिशनसाठी आस्तेकदम घेतल्याचे दिसून येत आहे. निवड झालेल्या ७७५ पैकी एकही  प्रवेश  पहिल्या सहा दिवसांत निश्चित झाला नसल्याचे दिसून येत आहे.

शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९९ शाळांनी  नोंदणी केली.  या शाळांमध्ये ७८६ बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी २७६६ पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. ५ एप्रिल रोजी राज्यस्तरावर सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ७७५ बालकांची निवड झाली. १२ एप्रिलला आरटीईच्या  पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला.

बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे. मात्र संकेतस्थळ स्लो चालत असल्यामुळे अलॉटमेंट लेटर आणि हमी पत्र डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. याशिवाय काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने पोर्टलवर खात्री करण्यास देखील तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. परिणामी  प्रवेश घेता येत नसल्याचे पालकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सहा दिवसांत एकही प्रवेश निश्चित झाला नसल्याचे १८ एप्रिलरोजी पोर्टलवर दिसून आले.

दरम्यान, ऑनलाइन प्रवपेश अर्जाची स्थिती  पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होत आहे. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळोन पुन्हा प्रयत्न करावा,  प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन २५ एप्रिलपर्यंत प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आणि त्याबाबतची पावती पडताळणी समितीकडून घ्यावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिम