शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना करावे लागणार सुधारित अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:48 IST

वाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्या

ठळक मुद्देअवर सचिवाचे पत्रजिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रि येत बदल

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  मुंबई उच्च न्यायालयाने शासनाच्या जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २0१७ च्या  धोरणास स्थगिती देतानाच २७ फेब्रुवारी २0१७ च्या  धोरणानुसारच बदल्या करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.  त्यामुळे या बदली प्रक्रियेंतर्गत नव्याने अर्ज मागविण्यात येत  आहेत. यासाठी केवळ बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या  राऊंडमध्ये अर्ज करणार्‍या शिक्षकांना  सुधारित अर्ज करावे  लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिवांनी १३ ऑ क्टोबर रोजी जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,  शिक्षणाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्रात हे स्पष्टपणे सूचित केले  आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने  शासनाच्या २७ फेब्रुवारी २0१७ च्या निर्णयानुसार जिल्हा परिषद  शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी नवे धोरण तयार केले  आहे; परंतु न्यायालयीन प्रकरणांमुळे या प्रक्रियेला विलंब होत  गेल्याने शासनाने यंदा कमीतकमी बदल्या होण्याच्या अनुषंगाने  १२ सप्टेंबर २0१७ रोजी सुधारित निर्णय घेऊन संगणकीय  बदली प्रणालीद्वारे विशेष संवर्ग भाग १, २, तसेच बदली  अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदलीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक  शिक्षकांकडून बदली अर्ज भरून घेतले आहेत. उपरोक्त  संवर्गा तील शिक्षकांच्या बदल्यांमुळे विस्थापित होणार्‍या शिक्षकांकडून  अर्ज भरून घेण्यासाठी चौथी फेरीही सुरू करण्यात आली; परंतु  शासनाने या संदर्भात १२ सप्टेंबर रोजी निर्णय घेऊन अंशत:  सुधारित केलेल्या निर्णयाला काही जिल्हा परिषद शिक्षकांनी  न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील  सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २0१७  च्या शासन निर्णयास स्थगिती देतानाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत  बदल्या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसार करण्याचे स्पष्ट आदेश  दिले. न्यायालयाच्या याच आदेशानुसार बदली अधिकार प्राप्त, तसेच  २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या बदली  धोरणानुसार शिक्षकांकडून नव्याने अर्ज मागविणे आवश्यक  असल्याने केवळ बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या फेरीत  बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांना आता नव्याने सुधारीत  अर्ज करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी २७  फेब्रुवारी २0१७ च्या निर्णयानुसार विनंती बदल्या करण्यासाठी  सुधारीत अर्जांचे नमुने शासनाच्या बदली पोर्टलवर उपलब्ध  करून देण्यात आले असून, हे अर्ज २३ ऑक्टोबर २0१७ पर्यंत  उपलब्ध राहणार आहेत. या बदली प्रक्रियेंतर्गत संबंधित  शिक्षकांना तात्काळ अर्ज करावे लागणार असून, आपला पसं तीक्रमही दर्शविणे आवश्यक राहणार आहे.

शासनाच्या सुचनेनुसार व न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून  जिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानुसार  शिक्षकांना सुधारित प्रक्रियेनुसार अर्ज करावे लागणार आहेत.      - अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी ( प्राथमिक)

टॅग्स :Teacherशिक्षक