नंदकिशोर नारे । लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम शहरामध्ये बीट मार्शल सुरु करण्यात आले आहे. लवकरच याची अंमलबजावणी जिल्हयात राबविण्यात येणार असल्याने अनुचित प्रकार, चोरीच्या घटना थांबतील. जिल्हावासियांसाठी हे बीट मार्शल सुरक्षिततेच्याबाबतील महत्वाचे ठरणार आहे. नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्याशी साधलेला संवाद... ‘बीट मार्शल’ची अंंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रत्यक्षात काय करणार ‘बीट मार्शल’व्दारे नियुक्त करण्यात आलेले पोलीस कर्मचारी प्रत्येक भागात फिरुन शहराची पाहणी करणार आहे. शक्यतोवर हे बीट मार्शल रात्रीच्यावेळीचं केल्या जाते, परंतु आपण दिवसा व रात्री दोन्ही वेळेत राबवित आहोत. त्यासाठी कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. बीट मार्शलची अंमलबजावणी प्रभाविपणे होत आहे का, यासाठी काय उपाय योजना आखलीत? जिल्हयातील अनुचित प्रकार, चोरी, अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी हे सुरु करण्यात आले आहे. कर्मचारी यावर काम करतात की नाही यावर विशेष लक्ष ठेवल्या जात आहे. त्यासाठी काही विशिष्ट भागात नोंदवही ठेवण्यात येत आहे. यामध्ये सहभागी कर्मचाºयांनी ठरवून दिल्यानुसार त्या भागात गेल्यानंतर त्यावर वेळ, परिसरातील परिस्थिती व स्वाक्षरी करायची आहे. दर आठवडयाला त्याची तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत काही उपाय योजना आहेत का? महिलांवरील अत्याचारास प्रतिबंध करण्याकरिता , महिलांची छेड काढणाºयांवर वॉच ठेवण्याकरिता महिलांना, कॉलेजच्या विद्यार्थीनींना एक हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. त्याशिवाय निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे. पिडीत महिला, युवतींनी ०७२५२२३४८३४ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जिल्हयामध्ये एकोपा, शांतता नांदावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत सतर्कता बाळगावी. पोलीस प्रशासन अनुचित प्रकार, अवैध धंदे करणाºयांची कदापी गैय करणार नाही. नागरिकांनी सहकार्य करावे.
‘बीट मार्शल’सुरक्षिततेसाठी महत्वाचे - वसंत परदेसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 20:18 IST