शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा - ऋषीकेश मोडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 15:19 IST

निवडणूक कामातील हलगर्जी खपवून घेणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषीकेश मोडक यांनी ११ मार्च रोजी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करतानाच आदर्श आचारसंहिताही लागू केली. सर्व शासकीय विभाग व निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाºयांनी जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना देतानाच निवडणूक कामातील हलगर्जी खपवून घेणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषीकेश मोडक यांनी ११ मार्च रोजी दिला. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, अपर जिल्हाधिकारी दिनेशचंद्र वानखडे, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, महसूलचे उपजिल्हाधिकारी आर. डी. काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा कोषागार अधिकारी चंद्रकांत खारोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी व्यंकट जोशी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखा अधिकारी युसुफ शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख व निवडणूक विषयक नोडल अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदान. ११ एप्रिल २०१९ रोजी होत आहे. तसेच अकोला मतदारसंघातील मतदान १८ एप्रिल २०१९ रोजी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सतर्क रहावे. आदर्श आचारसंहिता कालावधीत शासकीय वाहन, शासकीय कार्यालये अथवा कोणत्याही शासकीय इमारतीचा राजकीय कारणासाठी वापर केला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले विविध राजकीय जाहिरात फलक, मजकूर व झेंडे काढून घेण्याची कार्यवाही सर्व नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा निवडणूक कार्यालयाला सादर करावा, अशा सूचना दिल्या.आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशी कृती कोणत्याही शासकीय विभागाकडून होता कामा नये. निवडणूक कामकाजात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीविषयी कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास संबंधित शासकीय विभागांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी यावेळी केले. जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न करणाºयांविरोधात तातडीने कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 विविध समित्यांची स्थापनाउमेदवारांच्या निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक खर्च सनियंत्रण समिती तसेच प्रसारमाध्यमे प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीसह इतर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच आवश्यक नोडल अधिकाºयांची नेमणूक करण्यात आली असून सर्व समित्या आणि नोडल अधिकारी यांनी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून निवडणूक शांततामय व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवावेत. तसेच प्रत्येक मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा आणि दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी मोडक यांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९