शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरीत बालक, गरोदर महिलांना मिळणार पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:14 IST

जिल्ह्यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटात २५९३ बालके असून, ५०७ गरोदर महिला स्थलांतरीत असून, ही सर्व माहिती शासनाकडे पाठविण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गावातून स्थलांतरीत कुटुंबातील बालकांना पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टिकोनातून अंगणवाडी स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यात ६ महिने ते ६ वर्षे वयोगटात २५९३ बालके असून, ५०७ गरोदर महिला स्थलांतरीत असून, ही सर्व माहिती शासनाकडे पाठविण्यात आली, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले यांनी १५ जून रोजी दिली.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी व लॉकडाऊन आहे. रोजगारानिमित्त अनेक कुटुंब मुंबई, पुणे, नाशिक यासह महानगरात गेले होते. कोरोना विषाणू संसर्गाचे संकट लक्षात घेता महानगरात कामानिमित्त गेलेले कामगार, मजूर हे आपापल्या जिल्ह्यात परतत आहेत. त्या कुटुंबातील ६ महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची नावे अंगणवाडी केंद्रात नाहीत. त्यामुळे या बालकांना पोषण आहार मिळणे अशक्य आहे. लॉकडाऊनमुळे मजुरांना अगोदरच काम नाही, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. त्यातच कुटुंबातील बालकांचे कुपोषणही वाढू शकते, ही शक्यता पाहता आता या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांनाही पोषण आहार मिळण्याचे संकेत असून, त्या दृष्टीने गावपातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या माध्यमातून मे महिन्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात ६ महिने ते सहा वर्ष वयोगटात २५९३ बालके असून ५०७ गरोदर महिला आहेत. या सर्वांचा अहवाल जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शासनाकडे पाठवून पोषण आहाराची मागणी नोंदविण्यात आली आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनिसांकडून सर्वेप्रत्येक अंगणवाडी स्तरावर दाखल झालेल्या स्थलांतरीत कुटुंबातील बालकांचे सर्वेक्षण करण्याची अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही ग्रामीण प्रकल्पात सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.

वरिष्ठांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात अंगणवाडी स्तरावर स्थलांतरीत कुटुंबातील बालकांची व गरोदर महिलांची माहिती संकलित करण्यात आली आहे. २५९३ बालके आणि ५०७ गरोदर महिला असून, यासंदर्भातील अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे तसेच पोषण आहारासंदर्भात मागणी नोंदविण्यात आली.-नितीन मोहुर्ले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी

 

टॅग्स :washimवाशिम