शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कागदपत्रे हवीत तर पाच झाडे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:12 IST

गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच ग्रामसभेत घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तालुक्यातील टणका गटग्रामपंचायतने पर्यावरणवृद्धीचा संकल्पच केला आहे. या अंतर्गत गावातील प्रत्येक व्यक्तीला पाच झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, ही जबाबदारी पार पाडली, तरच शासकीय कागदपत्रे दिली जातील, असा ठरावच २९ जुनच्या ग्रामसभेत त्यांनी घेतला आहे. प्रत्येक व्यक्तीला ग्रामपंचायत मोफत वृक्षरोपांचे वितरण करणार आहे. राज्याच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेला सोमवार १ जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अंर्तगत वाशिम जिल्ह्यात शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत ४० लाख ३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक वनीकरण आणि वनविभागाने रोपांची जुळवाजुळव केली आहे. वृक्ष लागवड अभियानाच्या आराखडा सभेत सर्व प्रशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, निमशासकीय संस्था आणि शैक्षणिक संस्थांचे उद्दिष्टही निश्चित करण्यात आले आहेत. त्या ग्रामपंचायतींसाठीही स्वतंत्र उद्दिष्ट असून, बहुतांश ग्रामपंचायतींनी या वृक्ष लागवडीची तयारी केली आहे. त्यात वाशिम तालुक्यातील टणका गट ग्रामपंचायतचाही समावेश आहे. या गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया टणका, झोडगा आणि सोनगव्हाण या तिन्ही गावांत ई-क्लास जमिनीसह शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तथापि, पर्यावरण वृद्धीचा संकल्पच या ग्रामपंचायतने केला आहे. त्यामुळे निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षांची लागवड करण्याचे ग्रामपंचायतने ठरविले आहे. यासाठी सरपंच शरद गोदारा यांच्या अध्यक्षतेखाली २९ जुन रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत गटग्रामपंचायत अंतर्गत येणाºया तिन्ही गावांतील प्रत्येक व्यक्तीला ५ वृक्षरोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्याचा ठराव घेण्यात आला.  ही अट पूर्ण केल्याशिवाय कोणतीही शासकीय कागदपत्रे ग्रामपंचायतकडून दिली जाणार नाहीत, असा पावित्राच घेण्यात आला आहे. या वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायत ६ जुलैपासून प्रत्येक व्यक्तीला मोफत वृक्षरोपांचे वितरण करणार आहे, अशी माहिती सरपंच शरद गोदारा यांनी दिली आहे.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत