ऑनलाइ लोकमतवाशिम, दि. 13 - रिसोड तालुक्यातील ग्राम बिबखेडा येथील एका लग्न समारंभात १३ फेब्रुवारी रोजी अक्षता न मिळाल्याच्या कारणावरून वाद घालत अनेकांनी धुमाकूळ घातला. याप्रकरणी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रिता पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून, फिर्यादीच्या मुलीच्या लग्नामध्ये आरोपींनी अक्षता न मिळाल्याच्या कारणावरून वाद घालून लग्न समारंभात धुमाकुळ घातला. वऱ्हाडी मंडळीतील शोभिता चव्हाण हिला लाकडी रिपने डोक्यावर मारहाण केली आणि लग्नात अडथळा निर्माण केला. फिर्यादीच्या तक्रारीहून गोविंद कटके, गोपाल आटोळे, पवन मुंढे, सुरज गिऱ्हे, किसन आटोळे, महादा भिसे, शामराव गावंडे, विठ्ठल खारखेडे यांच्याविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३२४, ५०४, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.