शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
3
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
5
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
6
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
7
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
8
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
9
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
10
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
11
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
12
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
13
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
14
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
15
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
16
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
17
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
18
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
20
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...

‘इंडियट बॉक्स’च्या माध्यमातून व्यवसायिकांना बनविले ‘इडियट’

By admin | Updated: March 20, 2015 01:13 IST

नागपूर येथील चित्रांश कंपनीचा प्रताप, अकोल्यातील व्यापा-यांची दीड कोटींनी फसवणूक.

अकोला - नागपूर येथील चित्रांश कंपनीने इंडियट बॉक्स लागल्यानंतर त्यावर प्रसारित होणार्‍या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमाविण्याचे आमिष दाखवत शहरातील सुमारे ३४८ प्रतिष्ठानांच्या संचालकांना १ कोटी ३३ लाख रुपयांनी गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून देण्यात आलेले धनादेश वटले नसल्याने या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. चौकशीतून श्रीसूर्या प्रकरणानंतर आणखी एक कोट्यवधी रुपयांचा घोटाळा समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नागपूर येथील चित्रांश टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने इंडियट बॉक्सची एक योजना बड्या प्रतिष्ठानांसाठी कार्यान्वित केली. या योजनेनुसार कंपनी संबंधित प्रतिष्ठानामध्ये ३२ इंचाचा एलईडी टीव्ही लावून देईल. त्या मोबदल्यात संबंधित प्रतिष्ठाणाच्या संचालकांकडून अनामत रक्कम म्हणून ३५ हजार रुपयांचा धनादेश घेण्यात आला. या एलक्ष्डी टीव्हीवर दिवसभर व्यावसायिक जाहिराती प्रसारित होतील. त्याचा मोबदला म्हणून प्रतिष्ठानच्या संचालकांना सुरुवातीचे सहा महिने सात हजार रुपये, त्यानंतरचे सहा महिने आठ हजार रुपये व त्यानंतर नेहमीसाठी १0 हजार रुपये दरमहा मिळणार होते. ह्यइंडियट बॉक्सह्णच्या या मोहजालात अडकत शहरातील तब्बल ३४८ प्रतिष्ठानांच्या संचालकांनी या कंपनीशी करार केला व ३५ हजारांची रक्कम दिली. अशाच करारातून आकोट स्टॅन्ड परिसरातील रहिवासी आसिम शहजाद यांना सुमारे १४ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. हा धनादेश बँकेत वटला नाही. आसिम यांनी २४ नोव्हेंबर २0१४ रोजी ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम कंपनीकडे जमा केली. त्यानंतर कंपनीने त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये ३२ इंची एलक्ष्डी टीव्ही लावला. यावर २४ तास व्यावसायिक जाहिराती दाखविण्यात येत होत्या. सुरुवातीला काही महिने सात हजार रुपयांचे धनादेश मिळाल्याने त्यांचा यावर विश्‍वास बसला; मात्र २८ फेब्रुवारी रोजी दिलेला १४ हजार रुपयांचा धनादेश न वटल्याने त्यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क साधला. त्यांनी आसिम यांना टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे आसिम यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकीशोर मीणा यांच्याकडे केली. चित्रांश कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे

. *चित्रांशच्या नागपुरातील कार्यालयात तोडफोड

  चित्रांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने नागपुरातील प्रतिष्ठाणांनाही गंडविले. धनादेश न वटल्याच्या कारणावरून कंपनीच्या नागपूर येथील कार्यालयात यापूर्वी दोन ते तीन वेळा तोडफोड करण्यात आली होती.

*अकोल्यात ३४0 जणांनी केला करार

     चित्रांश कंपनीशी अकोला शहरातील तब्बल ३४८ प्रतिष्ठानांच्या संचालकांनी करार केला आहे. या ३४८ जणांनी प्रत्येकी ३५ हजार रुपयांची अनामत रक्कम कंपनीकडे जमा केली. त्यानुसार सुमारे एक कोटी २३ लाख ५५ हजारांची रक्कम कंपनीने शहरातून नेली आहे.