शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील गाळयुक्त खोऱ्यात हायड्रोकार्बन साठ्याची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 13:43 IST

शिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी संबंधित संस्थेला सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात हायड्रोकार्बनच्या साठ्याबाबत निश्चित माहिती मिळू शकणार आहे. 

शिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोऱ्यात हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी)  करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली असून, या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळ अधिकारी, तलाठ्यांनी संबंधित संस्थेला सहकार्य करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्या आहेत.

देशातील गाळयुक्त खोऱ्यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वनविभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सुचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सुचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील इतरही तालुक्यात ही मोहिम सुरू होण्याची शक्यता असून, हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात हायड्रोकार्बनच्या साठ्याबाबत निश्चित माहिती मिळू शकणार आहे. 

टॅग्स :Washim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय