शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो नागरिकांची नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात धडक

By नंदकिशोर नारे | Updated: September 12, 2023 13:15 IST

चामुंडा देवी मंदिर परिसरातील समस्यांसाठी नागरिक आक्रमक

वाशिम : शहरातील प्रभाग १५  अ आणि ब मध्ये येणाऱ्या चामुंडा देवी मंदिर परिसरातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वारंवार नगर परिषद प्रशासनाला विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने संतापलेल्या शेकडो नागरिकांनी नगर परिषद कार्यालयात धडक देऊन   विविध मागण्यांची तक्रार मुख्याधिकारी यांना दिली. यावेळी जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत येथेच ठिय्या देण्याचा पवित्रा घेतल्यानंतर मुख्याधिकारी यांनी तात्काळ समस्या मार्गी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्या परिसरात रवाना केले.

चामुंडा देवी मंदिर परिसर ही शहरातील खूप जुनी वस्ती आहे. गोरगरीब मजूरदार नागरिकांचे वास्तव्य येथे जास्त आहे. त्यामुळे नगरपालिकेने त्या भागाकडे कायमचं दुर्लक्ष केले आहे. मूलभूत सुविधांपासूनही येथील नागरिक वंचित आहेत.  या भागातील विद्युत खांबांवरील पथदिवे नेहमीच बंद असतात.  भूमिगत गटार योजना या भागात फिरकलीच नाही.  येथील रस्ते ही अरुंद असून नाल्या व्यवस्थित नाहीत.  या भागात हिंदू स्मशानभूमी आणि मुस्लिम कब्रस्तान आहेत मात्र तेथे जाण्यास रस्ताच नाही आणि ते गटारगंगेत रूपांतरित झाले आहे.

तसेच स्मशानभूमीला लागून सार्वजनिक शौचालयांच्या दोन इमारती आहेत. मात्र, येथे पाणी नाही,  सफाई होत नाही,  लाईट नाही त्यामुळे या शोभेची वास्तू बनल्या आहेत.यावेळी राजूभाऊ काळे ,दगडू खवणे,  बबलू शर्मा,  अविनाश वाळेकर,  पृथ्वीक गव्हाणकर,  रामेश्वर रोही, संतोष इंगोले,  लक्ष्मण चोपडे,  आकाश राऊत, आकाश खवणे,  छोटू शर्मा, रामभाऊ गाडेकर,  प्रकाश रत्नपारखी,  दत्तात्रय वानखेडे, बालाजी वानखेडे, ऋषिकेश गव्हाणकर,  ज्ञानेश्वर काळे,  अंबादास वानखेडे,  अमोल पवार, माजी सैनिक संतोष मोरे आदिंची उपस्थिती हाेती.

फाेटाेचा संचच मुख्याधिकाऱ्यांना सुपूर्द

चामुंडा देवी मंदिर परिसरातील शेकडो नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्या दालनात जाऊन तक्रार दिली. सोबतच विविध समस्यांच्या फोटोंचा संच त्यांना सुपूर्द केला.  यावेळी महिलांनी आक्रमकपणे आपल्या समस्या मुख्याधिकाऱ्यांच्या समोर मांडल्या.  याप्रसंगी तक्रारीचे गांभीर्य समजून गायकवाड यांनी आपल्या यंत्रणेला सुचित करून प्राधान्याने समस्या सोडविण्याचे आदेश दिले.

टॅग्स :washimवाशिम