शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

मानवी अवयव दान; आरोग्य विभागामार्फत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 15:39 IST

शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देआता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात.

वाशिम - मानवी अवयव प्रत्यारोपणासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. मृत्यूनंतरही जग पाहा, असे नेत्रदानाबाबत म्हटले जाते. आता नेत्रदानाबरोबरच इतर अवयवही दान करा आणि दुसºयांना जीवनदान द्या, असा नारा दिला जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता मरणोत्तर अवयव दानाच्या संख्येत वाढ होत असल्याचे आशादायी चित्र आहे. 

जन्माला आलेल्या मानवाला मृत्यु हा अटळ आहे. धकाधकीच्या युगात मानवाला विविध आजार जडत आहेत. शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे.  यातूनच ‘अवयव दान’ या संकल्पनेचा जन्म झाला. मृत्यूनंतर साधारणत: ४८ तास मानवी अवयव जीवंत राहु शकतात. या ४८ तासात नेत्र, मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस मृतक मनुष्याच्या शरीरातून काढण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. हेच अवयव गरजू व्यक्तींना जीवनदायी ठरतात. मृत्यूनंतरही शरिरातील अवयव इतरांना जीवनदान देऊ शकतात, याबाबत सेवाभावी संस्था आणि आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती केली जात आहे. साधारणत: सात-आठ वर्षांपूर्वी साधारणत: नेत्रदान करण्यावरच भर दिला जायचा. आता नेत्राबरोबरच मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस यासह महत्त्वाचे अवयव दान करण्याबाबतच्या जनजागृतीवर भर दिला जात आहे. अवयव दान मोहिमेत ‘व्यावसायिकता’ शिरू नये म्हणून केंद्र शासनाने १९९४ मध्ये एक अधिनियम पारीत केला आहे. मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये याकरिता केंद्र शासनाने ‘मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम, १९९४’ लागू केला आहे.  राज्यात १८८ नोंदणीकृत केंद्रे असून, त्यापैकी एक अवयव प्रत्यारोपणासाठी १५३ व एकापेक्षा जास्त अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ३५ केंद्रे आहेत. नेत्रदान, नेत्रपेढी व बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी २७८ केंद्रे आहेत. राज्यात मुत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, नेत्रपटल आदी अवयवांच्या यशस्वी प्रत्यारोपणातून अनेकांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील मृत्रपिंड प्रत्यारोपणाची आकडेवारी विचारात घेतली तर २०१५-१६ मध्ये ९७, २०१६-१७ मध्ये २०४ आणि २०१७-१८ मध्ये २३० मृत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. यकृत प्रत्यारोपणाच्या आकडेवारीनुसार, २०१५-१६ मध्ये ४१, २०१६-१७ मध्ये ११७ आणि  २०१७-१८ मध्ये १३४ यकृतांचे प्रत्यारोपण झाले. २०१५-१६ मध्ये ५ हृदय प्रत्यारोपण, २०१६-१७ मध्ये ३५ आणि २०१७-१८ मध्ये ५७ हृदय प्रत्यारोपण झाले. सर्वाधिक प्रत्यारोपण नेत्रपटल या अवयवाचे आहे.  २०१५-१६ मध्ये ३२३०, २०१६-१७ मध्ये २९८९ आणि २०१७-१८ मध्ये ३२०० नेत्रपटलाचे प्रत्यारोपण झाले.

मानवी अवयव दानासंदर्भात आरोग्य विभाग व स्वयंसेवी संघटनेच्यावतीने जनजागृती केली जात आहे. याचे सकारात्मक परिणाम म्हणून अवयव दान केले जात आहे. यामुळे गरजूंना जीवनदान मिळत आहे.- डॉ.  अनिल कावरखे,  वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रूग्णालय, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमOrgan donationअवयव दान