शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची वेळ बदलण्यापूर्वीच मानव मिशनच्या बसचे वेळापत्रक बदलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 18:04 IST

अनेक विद्यार्थीनींना शुक्रवार ६ मार्चपर्यंत खासगी वाहनाने खर्च करून प्रवास करावा लागला. 

ठळक मुद्दे कारंजा आगाराचा अजब कारभार विद्यार्थिनींचा आठवडाभर खासगी वाहनात प्रवास

लोकमत न्युज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील इंझोरीसह परिसरातील शालेय विद्यार्थीनींच्या प्रवासासाठी कारंजा आगारातून धावणाºया मानव मिशनच्या बसफेरीचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वीच अचानक बदलले आहे. शाळेची वेळ बदलण्यापूर्वीच ही फेरी सकाळी धावत असल्याने या बसने शैक्षणिक प्रवास करणाºया अनेक विद्यार्थीनींना शुक्रवार ६ मार्चपर्यंत खासगी वाहनाने खर्च करून प्रवास करावा लागला. विद्यार्थीनींचा शालेय प्रवास सुखकर व्हावा, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत एसटीच्या बसफेºया सुरू करण्यात आल्या आहेत. मानोरा ते कारंजा मार्गावरील विविध गावांत शिक्षण घेणाºया विद्यार्थीनींसाठीही कारंजा आगारातून मानव मिशनची एक बस सोडण्यात येते. उन्हाळ्याच्या दिवसांत रखरखत्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन शाळांची दुपारची वेळ बदलून सकाळच्या वेळेत शाळा भरविण्यात येते. त्यानुसार मानव मिशनच्या वेळेतही बदल केला जातो; परंतु शुक्रवार ६ मार्चपर्यंतही शाळांची वेळ बदलण्यात आली नसतानाही आठवडाभरापूर्वीपासूनच कारंजा आगारातून सोडण्यात येणारी मानव मिशनची बस दुपारऐवजी सकाळी धावत आहे. त्यामुळे विद्यार्थीनींना या बसचा कोणताही फायदा झाला नाही. त्यांना खर्च करून खासगी वाहनाने शाळेत जावे लागले. 

मानव मिशनच्या बसचे वेळापत्रक आठवडाभरापूर्वी बदलल्याचा आरोप चुकीचा आहे. एका शाळेकडून मागणी झाल्यानंतरही आम्ही ३ फेब्रुवारीपर्यंत पूर्वीच्याच वेळेत बसफेरी सोडत होतो. याबाबत शिक्षण विभागाचे अधिकृत पत्र प्राप्त झाल्यानंतर मात्र ३ फेब्रुवारीपासून सकाळी सुरू केली आहे.-मुकूंद न्हावकर, आगारप्रमुख, कारंजा