शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एचआरसीटी स्कोर २४, ऑक्सिजनची पातळी ५०; रामेश्वरची कोरोनावर यशस्वी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:26 IST

वाशिम : एचआरसीटी स्कोर २४, ऑक्सिजनची पातळी (एसपीओटू) ५० असलेल्या रामेश्वर राधाकिसन चव्हाण (रा. पारवा, ता. मानोरा) या युवकाने ...

वाशिम : एचआरसीटी स्कोर २४, ऑक्सिजनची पातळी (एसपीओटू) ५० असलेल्या रामेश्वर राधाकिसन चव्हाण (रा. पारवा, ता. मानोरा) या युवकाने आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि जिल्हा शासकीय कोविड रुग्णालयामधील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एका महिन्यानंतर त्याला १९ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून रामेश्वरला कोरोनामुक्त केल्याबद्दल त्याच्या नातेवाइकांनी डॉक्टरांचे आभार मानले.

पारवा येथील रामेश्वर चव्हाण या ३३ वर्षीय युवकाला कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले तेव्हा त्याचा एचआरसीटी स्कोर २४ इतका होता. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाइकांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, वाशिमसह आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करूनही बेड उपलब्ध न झाल्याने त्यांनी रामेश्वरला १५ मे २०२१ रोजी वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय येथील जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल केले. या वेळी त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी (एसपीओटू) सुमारे ५० च्या आसपास होती. कोविड रुग्णालयात दाखल झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. राम हजारे यांच्या चमूने रामेश्वरवर उपचार सुरू केले. त्याला सुरुवातीला हायफ्लो ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. मात्र, त्याची तब्येत खालावल्याने व्हेंटिलेटरच्या साहाय्याने त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. जवळपास १५ दिवस त्याच्यावर व्हेंटिलेटरच्या साहाय्याने उपचार सुरू होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हजारे यांच्या चमूने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे रामेश्वरचा कोरोना चाचणी अहवाल ३० मे रोजी ‘निगेटिव्ह’ आला. तो कोरोनामुक्त झाला, मात्र रुग्णालयात दाखल होण्यास विलंब झाल्याने फुप्फुसामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊन त्याच्या फुप्फुसाची हानी झाली होती. त्यामुळे कोरोनामुक्त होऊनही त्याच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढण्याची गती कमी होती. डॉक्टरांनी कृत्रिम ऑक्सिजनच्या साहाय्याने उपचार केल्याने त्याच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी हळूहळू ९२ पर्यंत वाढण्यास मदत झाली. त्यानंतर त्याला १९ जून रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

०००००

१५ दिवस व्हेंटिलेटरवर

डॉ. राम हजारे यांनी सांगितले की, रुग्णालयात दाखल केले तेव्हा रामेश्वरची तब्येत खूपच गंभीर झाली होती. सतत निगराणीखाली ठेवून तब्येतीतील बदल लक्षात घेत उपचारात बदल केले. सुमारे १५ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवून तसेच त्यानंतर पुन्हा कृत्रिम ऑक्सिजन देऊन फुप्फुसासातील संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर आमच्या प्रयत्नांना यश येऊन रामेश्वरने कोरोनावर मात केली.

जिल्हा कोविड रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन आमच्या रुग्णाला कोरोनामुक्त केले. आमच्या रुग्णाला चांगली आरोग्य सुविधा दिली, या सर्वांचे आम्ही आभार मानतो, अशा शब्दांत रामेश्वर चव्हाणची पत्नी उज्ज्वला चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

०००००

डॉक्टर, स्टाफचे कार्य कौतुकास्पद : डॉ. राठोड

जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत बाधित झालेले रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल होत होते. त्यांना वाचविताना डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही काही रुग्णांचा मृत्यू झाला, याचे आम्हाला दुःख आहे. मात्र, रामेश्वरसारख्या अनेक गंभीर रुग्णांचा जीव आम्ही वाचवू शकलो. या रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांचे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.