शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बालकामगार शोधणार कसे, वर्षभरापासून धाडसत्रच राबविले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 21:43 IST

child labor वर्षभरापासून बालकामगार निष्पन्न करण्यासंबंधीचे धाडसत्रच राबविण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सुनील काकडे

वाशिम : १४ वर्षाआतील मुलांना कुठल्याही उद्योग-व्यवसायात काम करण्यास मनाई करण्यासोबतच अशा मुलांना कामावर ठेवणे दखलपात्र गुन्हा आहे. दोषीला ६ महिने ते २ वर्षे तुरूंगवास अथवा २० ते ५० हजार रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असताना जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, धाब्यांवर बालकामगार कामे करित असताना प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे गत वर्षभरापासून बालकामगार निष्पन्न करण्यासंबंधीचे धाडसत्रच राबविण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.बालकामगारांसंदर्भातील जुन्या कायद्यानुसार ८३ प्रकारच्या व्यवसाय, उद्योगांमध्ये १४ वर्षाआतील मुलांकडून कामे करून घेण्यास बंदी होती. सुधारणा विधेयकात ही बंदी अधिक व्यापक करण्यात आली. त्यानुसार, १४ वर्षाआतील मुलांना कुठल्याही उद्योग-व्यवसायात काम करण्यास मनाई करण्यासोबतच अशा मुलांना कामावर ठेवणे दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला. असे असले तरी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अल्पवयीन मुलांना घरच्या शेतीत किंवा उद्योगात काम करण्यास परवानगी देण्यात आली. नेमक्या याच कारणामुळे बालमजूर ओळखण्याकामी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याशिवाय कमी पैशात कामे करण्यासाठी कामगार मिळत असल्याने हॉटेल्स, धाबे, नाश्ताविक्रीच्या गाड्यांवर बालकांना जुंपले जात आहे. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाकडून कारवाई होणे अपेक्षित आहे; मात्र फेब्रूवारी २०२० या महिन्यापासून धाडसत्रच राबविण्यात आलेले नाही. त्यामुळे हा प्रश्न दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. चार विभाग एकत्र येऊन करतात कारवाईकुठल्याही उद्योग, व्यवसायात बालकामगार राबत असल्यास धाडसत्र राबविण्याकरिता चार विभागांना एकत्र यावे लागते. त्यात सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, महिला व बालकल्याण, शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाचा सहभाग असतो. गत वर्षभरापासून यासंदर्भातील एकही कार्यवाही झाली नसल्याची माहिती आहे. घरगुती उद्योग, हॉटेल्स अथवा इतर तत्सम उद्योगांमध्ये १४ वर्षाआतील मुले काम करताना आढळल्यास कार्यवाही केली जाते. त्यानुसार, मार्च महिन्यात धाडसत्र राबविण्याची बाब विचाराधिन आहे. कायद्यानुसार मालक आणि संबंधित मुलांमध्ये ‘ब्लड रिलेशन’ असल्याचे सिद्ध झाल्यास कार्यवाही करता येत नाही.- गौरव नालिंदेसरकारी कामगार अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम