शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले!

By admin | Updated: August 18, 2016 00:47 IST

भाजीपाला झाला स्वस्त; किराणा महागला.

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. १७: गत अनेक वर्षापासून पावसाळयातील अत्यल्प पावसामुळे नापिकी व कोरडया दुष्काळात होरपळून निघाल्यानंतर यावर्षी समाधानकारक पावसामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक सुखावले. दुसरीकडे धान्य, किराणासह जिवनाश्यक वस्तुंचे भाव वधारल्याने गृहीणींचे बजेट मात्र पार कोलमडून गेले. यामुळे संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी गृहीणींना चांगलीच कसरत करावी लागत आहे. महागाईच्या मुद्यावरून अडीच वर्षांंंपूर्वी राज्य व केंद्रात तत्कालिन काँग्रेस सरकारविरोधात विरोधकांनी तोफ डागली होती. महागाईवरून तत्कालिन राज्यकर्त्यांंंना विरोधकांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यानंतर सत्तांतर होऊन महागाई कमी होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला होती. मात्र, प्रत्यक्षात महागाई विक्रमाचा नवा टप्पा गाठत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले असून यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. नेमके याच कालावधीत धान्य, किराणा सामान या जिवनाश्यक वस्तुंचे दर मागील काही महिन्यांच्या तुलनेत यावेळी वाढले असल्याचे दिसून येते. काही दिवसांपुर्वी ६0 रुपये प्रतिकिलो विकली जाणारी चना डाळीचे दर आता शंभर रुपयाच्यावर पोहोचले आहेत. पुर्वी साखरेचे ३२ रुपये प्रति किलो दर होते. आता ४0 रुपये प्रति किलो झाले आहेत. गूळ३0 रुपयावरुन ४५ रुपये किलोवर पोहोचला. तांदुळ ३0 रुपये किलोवरुन ५0 ते ५५ झाले आहेत. उडदाची डाळ १२0 रुपयावरुन १४0 रुपये किलो झाली आहे.१५ ते १८ रुपये किलो मिळणारा चांगला प्रतीच्या गव्हाचे दर २२ ते २६ रुपये किलो पर्यंंंत पोहोचले आहेत. २८ रुपये किलोने विकणारा रवा मैदा आता ३२ ते ३५ रुपयापर्यंंंत पोहोचला आहे. फराळासाठी लागणारे शेंगदाणे व साबुदान्याचे दर सुद्धा वाढले असून साबुदाना ५0 रुपयावरुन ६0 रुपये तर शेंगदाने ८५ रुपये किलोवरुन ११0 रुपये प्रति किेलो झाले आहेत. धान्य व किराणा सामानाचे दर वाढलेले आहेत. दुसरीकडे भाजीपाला स्वस्त झाल्यामुळे गृहीनींना काहीसा दिलासा मिळाला आहे. भाजीबाजारात फेरफटका मारला असता ८0 ते १00 रुपये विकले जाणारे टमाटे आता १0 ते २0 रुपये किलाने विक्री होत असल्याचे दिसून आले. शंभर रुपये किलोची भेंडी आता ३0 रुपयावर येवून ठेपली आहे. आलु व कांदयाचे दर सुद्धा ४0 रुपयापर्यंंंत खाली घसरले आहेत. एकंदरीत धान्य व किराणा सामानाचे दर वाढले असल्यामुळे घरसंसार चालविणार्‍या गृहीणींचे बजेट कोलमडले आहे.

*वस्तूचे नाव                जुने दर             नवीन दर हरबरा दाळ                   ६0                   १0५उडद दाळ                    १२0                   १४0उडद मोगर                  १४0                   १६0तांदूळ                           ४४                     ५४गुळ                              ३0                     ४५साखर                           ३२                     ४0साबुदाना                       ५0                     ६0शेंगदाना                        ८५                   ११0रवा/मैदा                        २८                    ३२गहू                         १८-२0                  २२-२६