वाशिम : स्थानिक बिलालनगरमध्ये वास्तव्यास असलेले शे. मन्सूर यांच्या घराला आग लागून ३ लाख ३८ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत फ्रिज, शिलाई मशीन, स्टिलचे कपाट, मुलीच्या लग्नाकरिता आणलेले कपडे, दैनंदिन वापराचे सामान, दागिने यासह रोख रक्कम ८0 हजार रुपये, असे एकूण ३ लाख ३८ हजार ७00 रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही.
घराला आग; तीन लाखांचे नुकसान
By admin | Updated: May 9, 2017 02:08 IST