मंगरुळपीर (जि. वाशिम ) : तालुक्यातील कंझरा शिवारातील गट नंबर ३८६ मध्ये हॉट मिक्स प्लॉन्ट कोणत्याही प्रकारची पुर्व परवानगी न घेता अवैधपणे सुरू करण्यात आलेला आहे. त्या जागेचा औद्योगीक प्रयोजनासाठी वापर करण्याबाबत पुर्व परवानगी न घेता वापर सुरू आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या प्रकल्पाविरूध्द आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी तलाठी व नायब तहसिलदार यांच्या पाहणी अहवालावरून असा अहवाल मंगरूळपीर तहसिलदारांनी जिल्हाधिकारी व खनिज विभागाकडे पाठविला आहे.अहवालामध्ये पुढे नमुद केले आहे, की कंझरा शिवारातील गट क्र.३८६ मध्ये 0.४0 आर मधील जमीनीवर गिट्टी, व डांबर मिक्स करण्याचा हॉट मिक्स प्रकल्प विना परवानगीने सुरू असल्या बाबत तलाठी कंझरा यांनी एक अहवाल कार्यालयाला सादर केला आहे तसेच प्रकल्पाची अधिक चौकशी नायब तहसिलदार महसुल यांचे मार्फत केली असता असे आढळुन आले की त्या ठिकाणी गिटी व डांबर मिङ्म्रण करून विक्रीचे काम सुरू आहे. सदरच्या ठिकाणी अंदाजे ५0 ब्रास गिट्टा जमा करून ठेवण्यात आलेली आढळुन आली तसेच डांबर साठवण्याची मोठी टाकी व मिक्सर मशीन आढळुन आल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे.हॉट मिक्स प्रकल्प सुरू करण्यापुर्वी जिल्हा खनिजकर्म वाशीम तसेच पर्यावरण विभागाची रितसर परवानगी घेणे आवश्यक असुन सुध्दा घेतलेली नाही.तसेच सदर जागेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता अकृषक वापर सुरू केल्या बाबत २0१३-१४ प्रकरणामध्ये तहसिल कार्यालयाने १२ हजार ३00 रूपये येवढा दंड दि.११ फेब्रुवारी २0१४ रोजी आकारलेला आहे. त्याबाबत अपिल प्रकरण अप्पर जिल्हाधिकारी यांचे कडे सुरू आहे.विना परवानगी अवैद्य रित्या सुरू असलेल्या प्रकल्पाविरूध्द आवश्यकती कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडे अहवाल सादर करण्या त आले आहे.आता वरिष्ठ स्तरावरून का कारवाई करण्यात येईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.यासंदर्भात तहसीलदार बळवंत अरखराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तलाठी व नायब तहसिलदार यांच्या पाहणीत सदर प्रकल्प विना परवानगीने सुरू असल्याचे दिसुन आले. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आला असुन वरिष्ठ याप्रकरणी योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
विनापरवानगीने थाटला हॉटमिक्स प्रकल्प
By admin | Updated: February 28, 2015 01:04 IST