मालेगाव तालुक्यातील मारसूल येथील रहिवासी गणेश शामराव निगोते (वय २२) हा रिसोडकडे येत असताना समोरील दुचाकीने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, यात दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर कोसळले. दोघांना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता गणेश निगोते यास डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मृतकाचे वडील शामराव निगोते यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून, वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. मृत गणेश हा रिसोड येथे उच्च शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील दुसऱ्या अन्य दुचाकीस्वाराबद्दल माहिती मिळू शकली नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यास अकोला येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
दोन दुचाकींची धडक; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:08 IST