मानोरा : फिर्यादीचा मुलगा रस्त्याने जात असतांना आरोपीने गंमतीमध्ये त्यास ढकलून दिले. याबाबत जाब विचारला असता, त्याने आपल्या इतर सहकार्यांसोबत संगणमत करून फिर्यादीची आई व भावास डोक्यावर चक्क कुर्हाड मारून जखमी केले. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून मानोरा पोलिसांनी रविवार, ७ रोजी चार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला.याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील गोंडेगाव येथील फिर्यादी गजानन श्रीधर राठोड (वय २८ वर्षे) याचा मुलगा रस्त्याने जात असताना आरोपी आकाश आत्माराम पवार यांनी गमंतीमध्ये त्यास ढकलून दिले. झालेल्या घटनेची हकीकत मुलाने घरी सांगताच फिर्यादीची आई व भाऊ जाब विचारण्याकरिता गेले असता, आरोपी अनिल आत्माराम पवार, आत्माराम बाबुसिंग पवार, यमुनाबाई नारायण पवार यांनी डोक्यावर कुर्हाड मारुन आकाशला जखमी केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून व याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय अहवालावरून मानोरा पोलिसांनी कलम ३२४, ५0४, ५0६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा अधिक तपास मानोरा पोलिस स्टेशनचे बीट जमादार शिवा राठोड, इश्वर बाकल करीत आहेत.
डोक्यावर कु-हाड मारून केले जखमी
By admin | Updated: May 8, 2017 01:33 IST