शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दमदार पाऊस, शेतकरी सुखावला! पुढील दोन दिवस 'येलो अलर्ट'

By दिनेश पठाडे | Updated: July 5, 2023 16:42 IST

बुधवारी ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात पावसाने लावली जोरदार हजेरी

दिनेश पठाडे, वाशिम: यंदा मान्सून लांबल्याने जिल्ह्यात आधीच पावसाची प्रचंड तूट निर्माण झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे पुनरागमन झाले. बुधवारीही सर्वदूर पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने ४ जुलैला वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. ५ जुलै रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला.

नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने ४ जुलै रोजी दुपारी वर्तविलेल्या अंदाजानुसार ५ ते ९ जुलैदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.  ५ जुलैला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.  ६ व ७ जुलैला सर्वत्र मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून या दोन दिवसात एक दोन ठिकाणी विजेच्या कडकटासह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ८ आणि ९ जुलैला बहुदा सर्वत्र भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. हवामान विभागाकडून दररोज पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यानुसार पुढील पाच दिवसाचे शक्यता वर्तविली जाते. दररोज व्यक्त केलेल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने आगमन केल्याने शेतकरी सुखावला असून अनेक भागातील रखडलेली पेरणी पूर्णत्वास जाणार आहे.

बुधवारी ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात दमदार पाऊस

नागपूर हवामान प्रादेशिक विभागाकडून ५ जुलैला वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी(दि.५) ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता. यादिवशी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली होती. तसेच विजांच्या कडकटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याने दिलेला हा अंदाज खरा ठरल्याचे चित्र पहावयास मिळाले. बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला.

टॅग्स :Rainपाऊस