शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची सक्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:03 IST

वाशिम: आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करून वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या किंवा अनुपस्थित राहणाऱ्याअधिकारी, कर्मचाऱ्यांवर या पुढे शिस्तभंगासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. ही बाब कार्यालयीन शिस्तपालन आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर आहे. या गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करून वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या किंवा अनुपस्थित राहणाऱ्याअधिकारी, कर्मचाऱ्यांवर या पुढे शिस्तभंगासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे.आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन दिवशी विहित वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले असून, अनुपस्थितीबाबत वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेत नाहीत किंवा पूर्वकल्पनाही देत नाहीत, तसेच मुख्यालय सोडताना किंवा दौºयासाठी जातानाही वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेत नाहीत. ही बाब कार्यालयीन शिस्तपालन आणि कार्यक्षम प्रशासनाच्या दृष्टीने गंभीर आहे. या गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर भूमिका घेतली असून, यापुढे क्षेत्रीय स्तरावर उप-संचालक, जिल्हा शल्यचिकित्सक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वच कार्यालयातील मुख्यालयात विना अनुमती अनुपस्थित राहणाºया, मुख्यालयी वास्तव्यास न राहणाºया अधिकारी, कर्मचाºयांची माहिती संकलित करून ती आरोग्य सेवा संचलनालयास कळवावी लागणार आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य संचालनालय प्रथमत: संबंधित अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी उपस्थित राहण्यास, वास्तव्यास राहण्याबाबत सूचना देऊन त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करणार आहे. त्याशिवाय विनाअनुमती कार्यालयात गैरहजर राहिल्यास, विनाअनुमती मुख्यालय सोडून गेल्यास अशा अधिकारी, कर्मचाºयांविरुद्ध निलंबन, शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असून, त्यासाठी त्यांची नावे नियुक्ती अधिकाºयांना कळविली जाणार आहेत. नियुक्ती अधिकाºयांना अशी नावे प्राप्त झाल्यानंतर गैरवर्तणुकीच्या बाबी अन्यप्रकारे त्यांच्या निदर्शनास आल्यापासून महिनाभराच्या आत कसूरदार अधिकारी, कर्मचाºयांना निलंबित करून शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करणार आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाने घेतलेल्या या भूमिकेमुळे आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या अनुपस्थितीबाबतच्या मनमानी प्रकाराला आळा बसून, गोरगरीब रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा मिळणे शक्य होणार आहे.पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणाºया किंवा विहित वेळेत उपस्थित न राहणाºया अधिकारी, कर्मचाºयांवर निलंबन आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतच्या सूचना आहेत. वरिष्ठ स्तरावरील निर्देशानुसार याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.-ए. व्ही. सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम.

टॅग्स :washimवाशिम