शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणुबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अंबादास सोनटक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:43 IST

वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी साधलेला हा संवाद...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक जण सावधगिरी म्हणून दक्षता घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोणकोणत्या उपाय योजना आरोग्य विभागाच्यावतिने राबविण्यात येत आहेत यासंदर्भात वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी साधलेला हा संवाद...

जिल्हयातील एकूण आरोग्य सुविधा कशी आहे?जिल्हयात लेडी हार्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांवर तपासणी केल्या जातआहे. वाशिम येथील स्त्री रुग्णालयात क्वारंटाईनची (१४ दिवस) व्यवस्था करण्यात आली ,  जिल्हा सामान्य रुग्णालयात दक्षतेसाठी विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आले  आहे.

जिल्हयात कीती व्हेंटिलटर्स आहेत?जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयातील ११ मिळून १७ ‘व्हेंटिलेटर्स’ उपलब्ध आहेत. रुग्णांवर योग्य उपचार केल्या जात आहेत.कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे,  अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यानंतर विशिष्ट अंतर राखून उभे राहणे, घराबाहेर न पडणे आदी दक्षता घेणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. सरकारने ज्या काही उपाययोजना सांगितले, निर्णय घेतले त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा संपूर्ण मानवजातीला संसर्ग होण्यास फारसा वेळ लागणार नाही. इटली, अमेरिका यासारख्या प्रगत देशांनी कोरोना विषाणूसमोर हात टेकले आहेत. त्यामुळे आपण कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन ‘लॉक डाऊन’च्या काळात घरातच राहणे आवश्यक आहे.

खासगी डॉक्टरांचे सहकार्य लाभत आहे का? २६ मार्चपर्यंत खासगी डॉक्टराना आरोग्य सेवा सरंक्षक कीट उपलब्ध नसल्याच्या कारणाने सेवा बंद केली होती. जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर संघटनेशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढल्यानंतर खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे. तसेच आरोग्य सेवेसाठी त्यांचे कधीही काम पडल्यास खासगी डॉक्टरमंडळी सेवा देण्यास तयार आहेत. दोन खासगी रुग्णालय अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम आहेच तर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.  अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यानंतर विशिष्ट अंतर राखून उभे रहावे व कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आरोग्य विभाग सर्वाची काळजी घेत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसinterviewमुलाखत