वाशिम : शिवभक्तांची काशी म्हणून ओळखल्या जाणार्या वाशिम शहरासह जिल्हय़ातील शिव मंदिरावर ७ मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त 'हर हर महादेवाच्या गजराने' नगरी दुमदुमून गेली होती. काशीनंतर सर्वात जास्त शिवमंदिरे वाशिम नगरीत असल्याचे वत्सगुल्म ग्रंथात उल्लेख आहे. मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी शहरातील शिवमंदिरावर भाविकांची गर्दी व विविध ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम पार पडलेत, तसेच गावागावात असलेल्या महादेवाच्या मंदिरांवर दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. वाशिम शहरातील श्री करुणेश्वर संस्थानमध्ये महाशिवरात्नी उत्सवानिमित्त वंदेमातरम मित्नमंडळाच्यावतीने शिवभक्तांना उसळीचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्नीनिमित्त करुणेश्वर मंदिरामध्ये सकाळी ८ वाजता आरती, पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजतापासून तर दुपारी २ वाजेपर्यंत येणार्या भाविक भक्तांना वंदेमातरम मित्नमंडळाच्या सदस्यांनी उसळीचे वाटप केले. भाविक भक्त तसेच महिला, पुरुषांनी महादेवाचे दर्शन घेतले.
महाशिवरात्रीनिमित्त ‘हर हर महादेव’चा गजर
By admin | Updated: March 8, 2016 02:27 IST